शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘मी खालच्या जातीचा’

By admin | Updated: May 7, 2014 07:08 IST

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे.

मुस्लीम - दलितांचा मोदींना कळवळा

गजानन जानभोर, वाराणशी

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे. आपण ‘खालच्या जाती’चे आहोत, हा साक्षात्कारही त्यांना पहिल्यांदाच झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फैजाबादच्या सभेत रामनामाचा जप करणार्‍या मोदींनी त्यानंतर २४ तासांच्या आत मुस्लीमांप्रति असलेली ‘कडवट’ भूमिका सौम्य करीत जातीचेही कार्ड खेळले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत मोदी यांना अचानक दलित-मुस्लिमांची आठवण झाली. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असा उपदेश मोदी यांनी दिला. ‘मी खालच्या जातीचा असल्यामुळेच माझा अपमान होत आहे़ खालच्या जातीत जन्मास येणे गुन्हा आहे का?’ असा भावनिक सवाल करणार्‍या मोदींच्या या नव्या भूमिकेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यास प्रियंका गांधी-वड्रा यांच्या ‘मोदी नीचले स्तर की राजनीति कर रहें है’, या टीकेचा संदर्भ असला तरी मोदींचा एकूण आविर्भाव ते जणू या संधीची वाटच पाहात असल्याजोगा होता. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींसाठी प्रायश्चित्त घेण्यास तयार नसलेले, त्यासाठी मुस्लीम समुदायाची माफी मागायला नकार देणारे मोदी मंगळवारी अचानक इतके ‘मवाळ’ झाले कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जागांवर बुधवारी आणि १८ जागांवर १२ मे रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांत जातीचे समीकरण फार प्रभावी आहे. दलित-मुस्लिमांशिवाय इतर मागासवर्गीयांचीही मते या मतदारसंघांतील गणिते बिघडवू शकतात. मोदींना अचानक आलेल्या जातीच्या कळवळ्यामागे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. फैजाबाद येथे सोमवारी रामनामाचा जप करीत ‘प्राण जाय पर वचन न जाए’या अयोध्येच्या संस्कृतीचा गजर केला होता. त्यामुळे आधीच भयग्रस्त असलेल्या मुस्लीम समाजात अस्वस्थता वाढू शकते, हे नंतर लक्षात आल्यामुळे मोदींनी ही सौम्य भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असेही मोदी म्हणाले.