शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद विद्यापीठाच्या दहा शिक्षकांची राजीनाम्याची धमकी

By admin | Updated: January 21, 2016 13:17 IST

रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठात निर्माण झालेली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे.

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. २१ -  रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठात निर्माण झालेली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. हैदराबाद विद्यापीठातील एससी आणि एसटी शिक्षकांनी पाच विद्यार्थ्यांच्या निलंबना विरोधात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून आपल्या सर्व प्रशासकीय पदांचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. 
विद्यापीठातील एससी/एसटी शिक्षक आणि अधिका-यांच्या संघटनेने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा निषेध केला. या प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. 
रोहित वेमुलाच्या मृत्यू प्रकरणी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे. 
विद्यापीठाच्या एससी/एसटी शिक्षक संघटनेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे अशी माहिती फोरमचे संयोजक सुधाकर बाबू यांनी दिली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आम्ही राजीनामा देऊ. सर्व विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करा आणि रोहितच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या या संघटनेच्या मागण्या सुधाकर बाबू यांनी सांगितल्या.