क्वालालंपूर : बेकार असलेल्या पतीने मूळ भारतीय असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत तिचे हात व पाय कापल्याची घटना मलेशियात घडली आहे. पत्नीवर असा क्रूर हल्ला केल्यानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. के मनेगा (४४) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, जोहोर येथील रूग्णालयात ती मृत्युशी झगडत आहे. बेकार पती ४७ वर्षांचा होता, त्याने विष पिऊन गळफास घेतला. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. मत्सर हे या गुन्ह्याचे मुख्य कारण ठरले असून, गेली १५ वर्षे सिंगापूर येथे राहणारी ही महिला हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करत होती. तिच्या उत्पन्नावरच घर चालत असे. महिन्यातून एकदा आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती मलेशियात येत असे. सिंगापूरमध्ये तिचे प्रेमसंबंध असल्याचा पतीचा आरोप होता. (वृत्तसंस्था)
पतीने कापले पत्नीचे हातपाय
By admin | Updated: December 15, 2014 03:11 IST