नाशिक : जेवणाचे बिल जास्त लावल्याची कुरापत काढून हॉटेलची तोडफोड व दगडफेकीत हॉटेल व्यवस्थापकाचा मृत्यू झाल्याची घटना २००८ मध्ये वडाळागाव परिसरातील गौरव बारमध्ये घडली होती़ यातील पाच आरोपींपैकी एका आरोपीविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तर इतर चौघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, २८ ऑगस्ट २००८ रोजी वडाळा परिसरातील गौरव बारमध्ये रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहुल नरेश जाधव (२२), गौतम बागुल, वैजनाथ उजागेर, विजय रायकर, पवन काळे (सर्व, रा. वडाळागाव) हे जेवणासाठी गेले होते. जेवनानंतर बिल जास्त लावल्याची कुरापत काढून संशयितांनी हॉटेलचे व्यवस्थापक सूरज शेी यांच्याशी वाद घातला. यानंतर हॉटेलची तोडफोड करून केलेल्या दगडफेकीत शेी यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या पाचही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ सरकारी वकील ॲड़ सुप्रिया गोरे यांनी यामध्ये सात साक्षीदार तपासून शेी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या राहुल जाधव याच्या विरोधात भक्कम पुरावे सादर केले़ त्यानुसार न्यायालयाने राहुल जाधव यास पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ तर उर्वरित चौघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ (प्रतिनिधी)
हॉटेल व्यवस्थापक मृत्यू प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: July 9, 2015 00:59 IST