शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅप प्रकरण : "त्या" महिलेला अटक

By admin | Updated: May 2, 2017 12:07 IST

भारतीय जनता पार्टीचे खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या महिलेला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 02 -  भारतीय जनता पार्टीचे खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या महिलेला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. 
के.सी.पटेल हे गुजरातच्या वलसाड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. के.सी. पटेल यांनी एका महिलेने आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत गेल्या आठवड्यात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, संबंधित महिलेने सुद्धा के. सी. पटेल यांच्यावरच बलात्काराचा आरोप केला आहे.  पेशाने वकील असलेल्या त्या महिलेने सांगितले की,  खारदार  के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. त्यादरम्यान माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर के. सी. पटेल डिनरच्या निमित्ताने गाझियाबादमधील माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत जोरजबरदस्तीने बलात्कार केला आणि तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे त्या महिलेने म्हटले आहे. तसेच, धमक्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी पुरावा म्हणून मला सीडी बनवावी लागली, असेही त्या महिलेने म्हटले आहे. 
यावर खासदार के. सी. पटेल आणि दिल्ली पोलिसांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिलेने यापूर्वी हरयाणातील एका खासदाराविरोधात तिलक मार्ग पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.  दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्या महिलेला तिच्या गाझियाबादमधील घरातून अटक केली असून ती याआधी सुद्धा अशाच एका प्रकरणात अडकली होती, असे पोलिसांनी म्हटले आहे.