शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री राजनाथ सिंहांवरील आरोपानंतर लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

By admin | Updated: November 30, 2015 17:10 IST

देशातील असहिष्णू वातावरणाबद्दल संसेदत चर्चेला सुरूवात करताना माकप खासदार मोहम्मद सलीम यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सोमवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ माजला.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.३० - देशातील असहिष्णू वातावरणाबद्दल संसेदत चर्चेला सुरूवात करताना माकप खासदार मोहम्मद सलीम यांनी थेट गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर गंभीर आरोप केल्याने आठवड्याच्या सुरूवातीलाच लोकसभेत प्रचंड गदारोळ माजला आणि सभागृहाचे कामकाज तीनवेळा स्थगित करण्यात आले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नियम १९३ अंतर्गत चर्चेला सोमवारी लोकसभेत सुरुवात झाली असता एका मासिकाचा संदर्भ देत '८०० वर्षांनंतर  हिंदू शासक सत्तेवर आला' असे राजनाथ सिंह यांनी म्हटल्याचा आरोप सलीम यांनी केला. मात्र राजनाथ सिंह यांनी त्यावर तत्काळ आक्षेप घेत हा आरोप अत्यंत गंभीर असून आपण असे कुठे व कधी म्हटलं, हे सलीम यांनी स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर सलीम यांनी 'आऊटलूक'मधील लेखाचा संदर्भ दिला. मात्र या वक्तव्यावरून विरोधक व सत्ताधा-यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. मोहम्मद सलीम यांच्या ओरापांची शहानिशा होईपर्यंत त्यांनी आपले मागणे मागे घ्यावी अशी मागणी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. गृमंत्री राजनाथ सिंह यांनीही सलीम यांच्या गंभीर आरोपांमुळे आपल्याला वेदना झाल्याचे सांगत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच ' जर देशाच्या गृहमंत्र्याने असे वक्तव्य केले असेल, तर त्याला पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सलीम यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी सुरू केली. मात्र सलीम यांनी  ‘आऊटलूक’ मासिकाची प्रतच सभापटलावर ठेवत संरक्षण देण्याची मागणी केली.
या प्रकरणानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ माजल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले. कामकाजज पुन्हा सुरू झाल्यावरही गोंधळ कायम राहिल्याने तीन वेळा कामकाज स्थगित करण्यात आले. 
दरम्यान, सलीम यांनी केलेला आरोप २४ तासांसाठी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला असून, त्याची पूर्ण शहानिशा केल्यानंतरच ते वाक्य सभागृहाच्या कामकाजात नोंदवायचे की नाही, याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत.