वाढत्या अपघातावर आवर घाला म्ह
By admin | Updated: September 3, 2015 00:17 IST
वाढत्या अपघातांना आवर घाला
वाढत्या अपघातावर आवर घाला म्ह
वाढत्या अपघातांना आवर घाला म्हापसा : गोव्यात वाढत्या वाहनांमुळे अपघात होऊन गोव्याचे भूमीपूत्र रस्त्यावर मृत्यू पावतात. मृत्यू पावणार्यांची संख्या वाढत आहे. या गंभीर विषयाचा सरकारने अभ्यास करून आवार घालावा अशी आरपीआयचे केंद्रीय सदस्य तुळश्ीदास परवार यांनी पत्रकातून मागणी केली आहे. सरकारने ज्या ठिकाणी अपघात होतात तेथे सिग्नल उभारणे तसेच पोलीस तैनात ठेवावे. चतुर्थी तोंडावर येऊन पोचली आहे. चतुर्थीचा सण मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. अचानकपणे अपघात झाला की त्या घरात सुखाऐवजी दु:खाचा सण साजरा होतो. म्हणून लवकरात लवकर सिग्नल घालण्यासाठी वेळ राहिलेला नाही. निदान पोलीस व होमगार्ड रस्त्यावर उभे करावे आणि अपघात रोखावे. सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर सरकारच अपघाताला जबाबदार राहिल. रिपब्लिकन पार्टीची नूतन कार्यकारणी स्थापन झाल्यानंतर या विषयी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही असे परवार यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)