शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दहशतीसाठी हिज्बुलला ८ वर्षात ८० कोटी

By admin | Updated: November 20, 2015 03:54 IST

भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे.

नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे. दरम्यान, भारतात दहशत माजविण्याकरिता हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला गेल्या आठ वर्षात पाकिस्तानातून ८० कोटी रुपये मिळाले असल्याची धक्कादायक माहिती आहे.दहशतवादाला आर्थिक मदतीवर नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत वित्तीय कारवाई कार्यदलाच्या (एमएटीएफ) अलीकडेच जाहीर झालेल्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. धोकादायक दहशतवादी गट आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) वाढत्या कारवाया लक्षात घेता दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशाचा पुरवठा रोखण्यासाठी जगभरातील विविध देश आणि आर्थिक शक्तींनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा एमएटीएफतर्फे घेण्यात आला.इसिसने पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून यात १२९ लोक ठार, तर शेकडो जखमी झाले होते. दहशवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अंकुश घालण्याकरिता भारताच्या प्रयत्नांबाबत या अहवालात सविस्तर माहिती आहे. त्यानुसार देशाने यावर्षी १५ आॅगस्टपासून आतापर्यंत ३७ संस्थांची खाती गोठविली असून त्यात ३ लाख युरो जमा आहेत. भारत एमएटीएफचा पूर्ण सदस्य आहे. अमेरिका, फ्रान्स,जर्मनी आणि इंग्लंडसारखे अन्य देशही त्यात सहभागी आहेत.एफएटीएफच्या अहवालानुसार हिज्बुल मुजाहिदीनला गेल्या आठ वर्षात भारतात दहशतवादी कारवायांकरिता पाकिस्तानातून विविध मार्गे तब्बल ८० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती भारताच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.हिज्बुलला पैसे पुरविण्यासाठी बँंिकंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या गटाने काश्मीर खोऱ्यासह भारतात अनेक ठिकाणी हल्ले आणि हिंसाचार माजविला आहे.हिज्बुल मुजाहिदीन भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात सक्रिय आहे. या पैशाचा वापर शस्त्रास्त्रे, कपडे, इतर साहित्य आणि दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी केला जातो. भारत, अमेरिका आणि युरोपने हिज्बुल मुजाहिदीनला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.