शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नाआधीच वडिलांचे निधन स्वप्न राहिले अधुरे : अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍या दिवशी श्रीमंती पूजन

By admin | Updated: July 13, 2016 23:11 IST

जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणार, त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने जोशी यांचे त्यात निधन झाले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणार, त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने जोशी यांचे त्यात निधन झाले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
शशिकांत जोशी यांच्या रोशनी या मुलीचा विवाह औरंगाबाद येथील संदीप या तरुणाशी निि›त झाला होता. १३ जुलै रोजी दुपारी १२.४० चा विवाहाचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता श्रीमंती पूजनाचाही कार्यक्रम ठरला होता. सर्वत्र लग्नाची धामधूम, नातेवाईकांची रेलचेल, दोन्ही कुटुंबात आनंदाचा क्षण जवळ येत असतानाच मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे काही क्षणातच आनंदावर विरजण पडले. लग्नाचा मुहूर्त निि›त झाला होता. नातेवाईकही आलेली होते. शिवाय खर्चही अमाप झालेला होता. या सार्‍या पेचात मुलीचे मामा अजय प्रल्हाद अत्रे यांनी विवाह ठरलेल्या वेळेत व्हावा म्हणून पुढाकार घेतला. संध्याकाळचे श्रीमंती पूजन रद्द करून साडे सात वाजता जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसर्‍या दिवशी अर्थात बुधवारी सकाळी साडे आठ वाजता श्रीमंती पूजन करण्यात आले व दुपारी ठरलेल्या वेळेवरच ब्राšाण सभेत विवाह उरकण्यात आला. जोशी यांचा मोठा मुलगा दिनेश हा विवाहित आहे तर लहान जितेंद्र हा अविवाहित आहे. रोशनी ही दोन भावांची एकुलती बहीण आहे. कन्यादानाला बाप नसल्याचे दु:ख रोशनी व नातेवाईकांनी मोठ्या हिमतीने पचवले.