शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदुत्ववादी’ चित्रपट ‘इफ्फी’त झळकणार!

By admin | Updated: November 15, 2015 02:16 IST

आक्रमक हिंदुत्वादाचा पुरस्कार करणारा चित्रपट असल्याचे कारण देत, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाकारलेल्या चित्रपटाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील

पणजी : आक्रमक हिंदुत्वादाचा पुरस्कार करणारा चित्रपट असल्याचे कारण देत, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाकारलेल्या चित्रपटाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागाची सुरुवात होणार आहे.विनोद मंकारा दिग्दर्शित ‘प्रियमानसम’ या संस्कृत चित्रपटाने यंदाच्या इंडियन पॅनोरमाची सुरुवात करण्याचा मान मिळवला असून, गोव्यातील पुरोगामी संघटनांचा त्यास विरोध होऊ शकतो.१७ व्या शतकातील संस्कृत कवी उन्नयी वॉरियर यांच्या जीवनावर आधारित या वादग्रस्त चित्रपटात कथानायकाच्या मानसिक द्वंद्वाचे चित्रण करण्यात आले आहे. ‘नलचरितम अट्टकथा’ या नृत्यनाट्याच्या निर्मितीत रममाण झालेल्या या कवीश्रेष्ठावर बेतलेल्या या चित्रपटात हिंदुत्ववादाचा पुरस्कार केल्याचे निर्देशक विनोद मंकारा यांनी नाकारले. ‘माझा चित्रपट ही एक निव्वळ कलाकृती म्हणून प्रेक्षकांनी पाहावी. तिथे कोणत्याही वैचारिक भूमिकेला थारा देत नाही,’ असे सांगून हा चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. केरळ चित्रपट महोत्सवाशी संबंधित व्यक्ती चित्रपट किंवा दृकश्राव्य माध्यमाशी संबंध नसलेली आहेत. परीक्षक मंडळही परिपूर्ण नव्हते, असे त्यांनी सांगितले.‘प्रियमानसम’ ही गेल्या २२ वर्षांतील पहिली संस्कृत चित्रपट निर्मिती ठरली आहे. या आधीही केवळ दोन संस्कृत चित्रपटांची निर्मिती झाली होती. त्यात आदि शंकराचार्य (१९८३) आणि भगवद्गीता (१९९३) यांचा समावेश आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन जी. व्ही. अय्यर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)