शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर, हरणबारी पाण्याची सुनावणी पूर्ण फैसला प्राधिकरणाच्या हाती : पाणी सोडणे अशक्य

By admin | Updated: December 1, 2015 23:37 IST

नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्‘ासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्‘ाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्‘ातील धरणांमधील उपलब्ध पाणी व त्याचे पिण्यासाठी करण्यात आलेले आरक्षण समसमान असल्याने पाणी सोडणे योग्य होणार नसल्याची बाजू मांडण्यात आली.

नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्‘ासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्‘ाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्‘ातील धरणांमधील उपलब्ध पाणी व त्याचे पिण्यासाठी करण्यात आलेले आरक्षण समसमान असल्याने पाणी सोडणे योग्य होणार नसल्याची बाजू मांडण्यात आली.चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या चार धरणांमधून जळगाव जिल्‘ासाठी गिरणा धरणात पाणी सोडण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. जळगाव व नाशिक या जिल्‘ांनी यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी मुंबईत त्याची सुनावणी घेण्यात आली. तत्पूर्वी गेल्या सुनावणी दरम्यान नाशिक जिल्‘ाच्या वतीने धरणातील पाण्याचे अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याचे प्राधिकरणाला सांगण्यात आले होते. त्यानंतर पाणी आरक्षणाची बैठक झाल्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत जिल्हाधिकार्‍यांनी पाणी आरक्षणाबाबत झालेली बैठक व करण्यात आलेले आरक्षण याची माहिती प्राधिकरणासमोर सादर केली. चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद या चार धरणांत सध्या उपलब्ध असलेले पाणी व त्यावर विविध पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव असून, या धरणांमधून जळगावसाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचे पटवून दिले. याशिवाय जे काही पाणी सोडण्यात येईल, ते जळगावपर्यंत पोहोचेल याची कोणतीही शाश्वती देणे शक्य नसल्याचे सांगितले. प्राधिकरणाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याची सुनावणी स्थगित केली आहे. मात्र गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जनआंदोलनाचा उडालेला भडका बघता प्राधिकरण त्यातून बोध घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.