शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

इराकमधील अपह्रत भारतीयांचा ठावठिकाणा लागला

By admin | Updated: June 19, 2014 17:32 IST

इराकमधील मोसूल शहरात बेपत्ता असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत इराक सरकारने अपह्रत भारतीयांच्या ठावठिकाणाही शोधला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१९-  इराकमधील  मोसूल शहरात बेपत्ता असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला  असून इराक सरकारने अपह्रत भारतीयांच्या ठावठिकाणाही शोधला आहे असे परराष्ट्र मंत्रालयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र याविषयी अधिक जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. 
इराकमधील मोसूल येथे बांधकाम साईटवर काम करणारे ४० कामगार बेपत्ता झाले होते. या कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त होते. गुरुवारी दुपारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताला दुजोरा दिला.  भारत सरकार इराक सरकारच्या संपर्कात असून भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. इराक सरकारने अपह्रत भारतीयांना कोठे ठेवले आहे याचा शोध घेतला आहे असे त्यांनी सांगितले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव याविषयीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 
अपह्रत भारतीयांमध्ये पंजाब आणि केरळ येथील नागरिकांचा समावेश असून इराकमध्ये त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अपह्रत भारतीयांना मायदेशी परतणे अशक्य आहे अशी भिती व्यक्त होत होती.  याविषयी अकबरुद्दीन म्हणाले, कागदपत्रांची पूर्तता हा महत्त्वाचा विषय नाही. परदेशातील कोणत्याही भारतीयाने भारतीय दुतावासाशी संपर्क साधल्यास त्यांचे कागदपत्र फॅक्स किंवा अन्य माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची सोय करु. 
दरम्यान, गुरुवारी सकाळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेकडे लक्ष असल्याचे सांगितले. मी व माझे सहकारी भारतीयांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न करत आहोत असे स्वराज यांनी सांगितले होते. स्वराज यांनी पंजाब व केरळमधील मुख्यमंत्र्यांशीही फोनवरुन चर्चा केली.