शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करणार

By admin | Updated: September 23, 2016 01:53 IST

महागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आता ‘हायटेक’ पद्धतीचा अवलंब करण्याच्या तयारीत असून, यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.

नितीन अग्रवाल , नवी दिल्लीमहागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आता ‘हायटेक’ पद्धतीचा अवलंब करण्याच्या तयारीत असून, यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे. यामार्फत ग्राहकांना जादा किंमत वसूल करणाऱ्यांविरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार करता येईल.अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने यासाठी मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच हे अ‍ॅप ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे वैशिष्ट्य असे की, यामार्फत ग्राहकांना थेट मंत्रालयाशी संपर्क साधता येईल. तसेच ग्राहकांना आवश्यक अन्नपदार्थांच्या किरकोळ मूल्याबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल. एखाद्या दुकानदाराविरुद्ध जादा किंमत वसूल केल्याची तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. तक्रारी प्राप्त होणे आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी कमी वेळ लागेल.

सुरुवातीला हे अ‍ॅप्लिकेशन राजधानी दिल्लीतील ग्राहकांपुरतेच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर इतर मोठ्या आणि छोट्या शहरांतही उपलब्ध करून दिले जाईल. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. मंगळवारी या समितीच्या बैठकीत महागाईला कसा आळा घालता येईल, यावर व्यापक चर्चा केली. चर्चेअंती मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. त्यानुसार मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्याचे निर्देश जारी करण्यात आले.

याआधी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक वस्तू अधिनियमन कायद्यात सुधारणा करून किरकोळ किमती निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून ठोक आणि किरकोळ दरातील तफावत मर्यादित करता यावी. याशिवाय डाळींचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात करण्यात आली. तसेच साठेबाजांविरुद्ध कारवाईही करण्यात आली. एवढे प्रयत्न करूनही जनता महागाईने त्रस्त होती.