शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

हेरॉल्ड प्रकरणावरून जेटली-सोनिया वाक्युद्ध

By admin | Updated: December 11, 2015 23:48 IST

कायद्यापेक्षा महाराणी श्रेष्ठ, या परंपरेचा भारताने कधीही स्वीकार केलेला नाही. संसदेचे कामकाज रोखण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयीन प्रक्रि येचा सामना केला पाहिजे

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीकायद्यापेक्षा महाराणी श्रेष्ठ, या परंपरेचा भारताने कधीही स्वीकार केलेला नाही. संसदेचे कामकाज रोखण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयीन प्रक्रि येचा सामना केला पाहिजे, अशा तिखट शब्दात अर्थमंत्री जेटलींनी कोणाचेही नाव न घेता गांधी परिवारावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. लागलीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही तिखट शब्दांत पलटवार केला. शिवाय काँग्रेसने शुक्रवारीही संसदेच्या उभय सभागृहांमधे आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सरकार काँग्रेसशी दुर्भावनेने व राजकीय सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोपही स्पष्टपणे फेटाळून लावताना जेटली म्हणाले, सरकारने अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. सोनिया व राहुल गांधींचे थेट नाव न घेता जेटली म्हणाले, राजकीय पक्षाच्या आर्थिक उत्पन्नाला आयकरातून सूट असते. अशी रक्कम काँग्रेसने एका रिअल इस्टेट कंपनीच्या नावे वर्ग केली. आर्थिक उलाढालीच्या या प्रकारात काँग्रेसने स्वत:साठी स्वत:च एक चक्रव्यूह तयार केला आहे. आयकर अधिकारी नियमानुसार आपले काम करीत आहेत. सक्त वसुली संचलनालयाने संबंधितांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही वा या प्रकरणी सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. तरीही सरकार राजकीय सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, तो गैर आहे.संपुआ सरकार सत्तेवर असल्यापासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे नमूद करीत जेटली म्हणाले, दिल्लीतील एका फौजदारी न्यायालयाने सुनावणीसाठी हे प्रकरण दाखल करून घेतले. न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टाने नुकतेच योग्य ठरवले. कोणतेही निकाल नेहमीच अनिश्चित असतात. ही न्यायालयीन लढाई कायदेशीर मार्गानेच लढायला हवी. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. सरकार अथवा संसद काँग्रेसला सदर प्रकरणात कोणतीही मदत करू शकणार नाही.