संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र (युनो) भूस्खलनानंतरच्या बचाव कार्यात भारत आणि नेपाळ सरकारला साहाय्य करीत असून, विस्थापित झालेल्या हजारो नागरिकांनाही ते मदत पुरवत आहेत.
संयुक्त राष्ट्राचा मानवीय व्यवहार समन्वय विभागाचे (ओसीएचए) बँकाक येथील प्रादेशिक कार्यालय भूस्खलन झाल्यापासूनच भारत सरकारच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रातील पुणो शहराजवळ 3क् जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात 13क् जणांचा बळी गेला असून, इतर 6क् अद्यापही बेपत्ता असल्याचे ओसीएचएने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)