हॅलो 2- गीतगायन स्पर्धेत निराकार विद्यालय पहिले
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
काणकोण : माशे येथील निराकार सभागृहात झालेल्या र्शीरंग लोलयेकर तालुका पातळीवरील देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत माशेच्या निराकार विद्यालयाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले.
हॅलो 2- गीतगायन स्पर्धेत निराकार विद्यालय पहिले
काणकोण : माशे येथील निराकार सभागृहात झालेल्या र्शीरंग लोलयेकर तालुका पातळीवरील देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत माशेच्या निराकार विद्यालयाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले.तर अनुक्रमे काणकोणच्या मल्लिकार्जुन विद्यालय, लोलये दामोदर विद्यालय यांना पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत 9 विद्यालये आणि तीन उच्च माध्यमिक विद्यालयांनी सहभाग घेतला होता. माशे क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेची बक्षिसे स्व. र्शीरंग लोलयेकर यांचे सुपुत्र अतुल लोलयेकर यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला संगीतकार सिध्दनाथ बुयांव, यतीन तळावलीकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.सिध्दनाथ बुयांव, यतीन तळावलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. माशे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुदेश प्रभूदेसाई यांनी स्वागत केले. संजय नाईक, शरेंद्र नाईकयांनी सूत्रसंचालन केले. प्रणय नाईक यांनी आभार मानले. या वेळी सिध्दनाथ बुयांव यांनी स्पर्धेत सहभागी विद्यालयांना आपला नवीन आल्बम भेट म्हणून दिला. संदेश नाईक, सिध्दनाथ बुयांव आणि यतीन तळावलीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. (प्रतिनिधी)