शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणी वाटपाच्या मुद्यावर आमदार ठाम मुंबईला सुनावणी : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निकाल ठेवला राखीव

By admin | Updated: December 1, 2015 23:36 IST

मुख्य १ साठी

मुख्य १ साठी

जळगाव : गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका आणि पाणी योजनांचा विचार करता समान पाणी वाटपाचे तत्व लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून गिरणा धरणात २५ टक्के पाणी सोडण्यात यावे या विषयावर जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी ठामपणे बाजू मांडली.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर मुंबई येथे मंगळवारी दुपारी १२ ते साडे तीन यावेळेत ही सुनावणी झाली. या सुनावणीला चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील, जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, नाशिक जिल्ह्यातील आमदार व सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, आमदार शेख, आमदार जे.पी.गावित, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह नाशिकचे महापौर, नाशिकचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील नागासाक्या, केळझर, हरणबारी, पुनोद, चणकापूर हे पाचही धरण शंभर टक्के भरलेले आहेत. या धरणातून २५ टक्के पाणी गिरणा धरणात पाणी सोडल्यास जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पाचही धरणांमधून पाणी सोडण्यास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी विरोध केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दोन्ही बाजूचा निर्णय ऐकून घेत निकाल राखीव ठेवला आहे. आठवडाभरात निर्णय होण्याची या प्रकरणी शक्यता आहे.