शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्यालय पडले ओस

By admin | Updated: September 24, 2014 00:02 IST

लोकसभा निवडणुकीत ठाणे महापालिकेचे ९० टक्के कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या सर्वच कामांवर झाला होता.

ठाणे : लोकसभा निवडणुकीत ठाणे महापालिकेचे ९० टक्के कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या सर्वच कामांवर झाला होता. त्यानंतर, आता पुन्हा विधानसभा निवडणूक लागल्याने पालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयेही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांअभावी ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांची महिनाभरानंतरच सुटका होणार असल्याने आता नागरिकांची कामे दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.लोकसभा, विधानसभा अथवा पालिकेची निवडणूक असली तरीदेखील पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात येते. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागामार्फत महापालिका प्रशासनाला रीतसर आदेश काढण्यात येतो. शिपायापासून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच ही कामे विभागून देण्यात येतात. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावांत बदल, मतदार यादीतील त्रुटी, मतदारांची यादी तयार करणे, मतदान पावत्यांचे वाटप अशा स्वरूपाची कामे असतात. यंदाही विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हा निवडणूक विभागाचे जसजसे आदेश येत आहेत, त्यानुसार निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येत असून त्यामध्ये पालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वच विभागांतील मुख्यालयासह प्रभाग समितीमधील अर्ध्याहून अधिक अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामासाठी आतापर्यंत पाठवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अत्यावश्यक सेवा विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने त्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले होते. पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रेदेखील कित्येक दिवस बंद होती. आता विधानसभेची निवडणूक लागली असून टप्प्याटप्प्याने कर्मचारी, अधिकारी निवडणूक कामात गुंतले जात असल्याने त्याचा परिणाम आता विविध सेवांवर होऊ लागला आहे. त्यात महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळला असताना मालमत्ता, पाणीपुरवठा, शहर विकास विभाग, जाहिरात विभाग आदी महत्त्वाच्या विभागांतील कर्मचारीही निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आता त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावरदेखील होणार आहे. (प्रतिनिधी)