शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

निपाणीतील ६० वर्षांच्या बसस्थानकावर हातोडा!

By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST

निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे प्रवेशद्वार असलेल्या निपाणीतील बसस्थानकाच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पाच कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या बसस्थानकावर हातोडा टाकून कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे तिन्ही राज्यांतील लोकांना या सुसज्ज बसस्थानकाचा लाभ होणार आहे. बेळगाव जिल्‘ात बेळगावनंतर निपाणी हे शहर मोठे आहे. येथील बसस्थानकातून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या बस धावत असल्याने नेहमीच हे बसस्थानक गजबजलेले असते; पण गेल्या काही वर्षांपासून स्थानकात समस्या वाढल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्रातील अनेक गावांत जाणार्‍या प्रवाशांना निवाराशेडच कमी पडत असल्याने प्रवाशांना उन्हात व पावसातच थांबावे लागत होते. त्याची दखल घेऊन मंत्री प्रकाश ह

निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे प्रवेशद्वार असलेल्या निपाणीतील बसस्थानकाच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पाच कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या बसस्थानकावर हातोडा टाकून कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे तिन्ही राज्यांतील लोकांना या सुसज्ज बसस्थानकाचा लाभ होणार आहे. बेळगाव जिल्‘ात बेळगावनंतर निपाणी हे शहर मोठे आहे. येथील बसस्थानकातून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या बस धावत असल्याने नेहमीच हे बसस्थानक गजबजलेले असते; पण गेल्या काही वर्षांपासून स्थानकात समस्या वाढल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्रातील अनेक गावांत जाणार्‍या प्रवाशांना निवाराशेडच कमी पडत असल्याने प्रवाशांना उन्हात व पावसातच थांबावे लागत होते. त्याची दखल घेऊन मंत्री प्रकाश हुक्केरी आणि आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी पाठपुरावा केल्याने सुसज्ज बसस्थानक निर्मितीसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. जुन्या बसस्थानकातील व्यावसायिकांना दोन महिन्यांपूर्वीच अन्यत्र हलविण्यात आले आहे. इमारत पाडताना प्रवासी, वाहनांना व्यत्यय होऊ नये यासाठी इमारतीच्या परिसरात लाकडी बांबूचे कुंपण घालण्यात आले आहे. या बसस्थानकाचे काम सुरू असताना स्थानकाचे स्थलांतर न करता शेजारच्या रिकाम्या जागेतच तात्पुरती प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे; पण फलकच नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. स्थानकातील नियंत्रण कक्ष जवळच्याच गणेश मंदिराशेजारी हलविण्यात आला आहे. सध्या कडक ऊन आणि वळवाच्या जोराच्या सरी येत असल्याने प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडत आहे. बसस्थानकाची जुनी प्रशस्त इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराला ७५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. इमारत पाडल्यानंतर दगड, माती, स्टील आणि लोखंडी साहित्य कंत्राटदाराच्या मालकीचे होणार आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला असून, इमारत निर्मितीचे काम वेळेत पूर्ण केल्यास त्याचा प्रवाशांना लाभ होणार आहे, अन्यथा समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. (प्रतिनिधी)

फोटो - 09एनपीएन01 - बसस्थानक इमारतीचे पाडण्यात येत असलेले बांधकाम.