शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता

By admin | Updated: April 20, 2015 13:10 IST

तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

नेवासा : तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. गोशाळेचे उद्घाटनही यावेळी झाले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने नामवंतांची प्रवचने, कीर्तने झाली.विकासप्रश्नी चर्चाकरंजी : पाथर्डी तालुक्यातील विविध रस्ते व इतर प्रश्नी तालुक्यातील शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात जि.प. सदस्या उषा कराळे, सेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, देविदास वांढेकर, सरपंच शिवाजी मचे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.अध्यक्षपदी खाटीकनेवासा : तालुक्यातील सुलतानपूर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी नारायण खाटीक यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संचालकांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.भाविकांची गर्दीपाथर्डी : शनि अमावस्येनिमित्त मायंबा येथे शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. नाथांचा जयघोष करीत मढी, मायंबा येथे संजीवन समाधीसह वृध्देश्वरच्या स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.खंडित वीज पुरवठापाथर्डी : तालुक्यातील धारवाडीसह गितेवाडी, डोंगरवाडी येथील वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज पुरवठा करणार्‍या मुख्य लाईनच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.शाळेला पुरस्कारटाकळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील बेटवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक मिळाला, अशी माहिती पोपट ठाणगे यांनी दिली.,टाकळीत सप्ताहटाकळीढोकेश्वर : येथील दत्त मंदिरात १९ ते २६ एप्रिल याकालावधीत डॉ.नारायण महाराज जाधव व बाळासाहेब महाराज पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात नामवंतांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.,बससेवा सुरुढवळपुरी : सुतारवाडी-भगवानगड या सुरु करण्यात आलेल्या बससेवेचा शुभारंभ श्री क्षेत्र भगवानगड येथे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज यांच्या हस्ते झाला. बससेवा सुरु झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.