शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हंगपन दादा यांना मरणोत्तर ‘अशोकचक्र’

By admin | Updated: August 15, 2016 06:24 IST

लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला

नवी दिल्ली : दोन महिन्यांपूर्वी सीमेवरून काश्मीरमध्ये घुसू पाहणाऱ्या चार पाकिस्तान प्रशिक्षित सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा करत, स्वत:च्याही प्राणांची बाजी लावून शहीद झालेले भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोघांना शौर्य चक्रे, तर दोघांना सेना पदके जाहीर झाली आहेत.तिन्ही सेनादलांचे सरसेनापती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा यासाठी अतुलनीय शौर्य बजावणाऱ्या सेनादलांमधील आजी-माजी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कार जाहीर केले. त्यापैकी शांतता काळात दिला जाणारा ‘अशोक चक्र’ हा सर्वोच्च बहुमान हवालदार हंगपन दादा यांना जाहीर झाला. काश्मीरच्या शमसाबारी या १३ हजार उंचीवरील बर्फाच्छादित पर्वतराजीत दादा यांनी चार घुसखोर अतिरेक्यांना २७ मे रोजी कंठस्नान घातले होते. दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशातील आहेत. ते आसाम रेजिमेंटच्या ३५ व्या बटालियन राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार होते. राष्ट्रपतींनी अशोक चक्राखेरीज अन्य ८२ पुरस्कारांना मान्यता दिली आहे. यात १४ शौर्यचक्रे, ६३ सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायू सेना पदकांचा समावेश आहे.राज्यातील शौर्य पदक विजेत्यांमध्ये कॅ. गौरव शरद जाधव (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी/राष्ट्रीय रायफल्स ३६ वी बटालियन) व नाईक शंकर चंद्रभान शिंदे (कॉर्पस आॅफ इंजीनियर्स/राष्ट्रीय रायफल्स ४४ वी बटालियन) यांचा समावेश आहे. शिंदे मुळचे नाशिक जिल्ह्यातील भयाळे गावातील होते. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांश्ी लढताना शहीद झालेल्या शिंदे यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले आहे.याखेरीज लान्स हवालदार रामेश्वर पुंडलिक दसपुते (कॉर्प््स आॅफ इंजीनियर्स/ राष्ट्रीय रायफल्स २री बटालियन) आणि गनर सदाशिव मारुती मोरे (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी/राष्ट्रीय रायफल ४१ वी बटालियन) या राज्यातील शूर जवानांना सेवा मेडल जाहीर झाले. अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य आलेल्या मोरे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)