शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आधी हात पकडलास, आता मुलीच्या पाया पड - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: September 9, 2015 08:19 IST

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बेडरुममध्ये शिरुन तिचा हात धरणा-या तरुणाला कमी शिक्षा हवी असेल तर त्याने संबंधीत मुलीच्या पाया पाडून तिची माफी मागावी असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ८ - एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बेडरुममध्ये शिरुन तिचा हात धरणा-या तरुणाला कमी शिक्षा हवी असेल तर त्याने संबंधीत मुलीच्या पाया पाडून तिची माफी मागावी असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 
सिकंदराबादमधील भाग्यलक्ष्मीनगरमध्ये राहणा-या एका तरुणाचे त्याच्या शेजारी राहणा-या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. संबंधीत तरुण हा दररोज त्या मुलीचा पाठलाग करायचा. या प्रकाराची मुलीने आईवडिलांकडे तक्रार केली होती. मुलीच्या पालकांनी त्या तरुणाला दमबाजीही केली होती. मात्र तरीदेखील त्या तरुणाने मुलीचा पिछा सोडला नाही. जानेवारी २००५ मध्ये सकाळी त्या तरुणाने मुलीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला व तिचा हात धरुन लग्नाची मागणी घेतली. यासंदर्भात पिडीत मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. जबरदस्तीने घरात प्रवेश करुन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्या तरुणाला कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षाचा तुरुंगवास व  एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. हायकोर्टानेही याप्रकरणात शिक्षा कायम ठेवली मात्र शिक्षेचा कालावधी पाच वरुन दोन वर्ष एवढा करण्यात आला होता. 
हायकोर्टाच्या निकालानंतर संबंधीत तरुणाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नुकतीच सुप्रीम कोर्टाच्या  टी एस ठाकूर आणि वी गोपाल गौडा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. तरुणाला शिक्षा भोगावीच लागेल कारण त्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. पण त्याची शिक्षा एक वर्षांवर आणली जाऊ शकते. आधी हात धरलास आता संबंधीत मुलीचे पाय धरुन माफी मागावी लागेल व तिने माफी देण्यास तयारी दर्शवली तर तुम्ही तडजोड करुन शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न करु शकता' असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.