शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हातमाग व्यवसायास मिळणार चालना!

By admin | Updated: August 5, 2015 22:38 IST

देशात ४३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या हातमाग व्यावसायिकांना चालना देण्यासाठी दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या ७ तारखेला ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा

राम देशपांडे, अकोलादेशात ४३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या हातमाग व्यावसायिकांना चालना देण्यासाठी दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या ७ तारखेला ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच या विशेष दिनी दरवर्षी देशातील उत्कृष्ट हातमाग व्यावसायिकांना संत कबीर व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.भारतीय बाजारपेठेत विविध ब्रांडेड कंपन्यांद्वारा निर्मित हातमाग वस्त्रांचा बोलबाला असला तरी, भारतीय विणकरांनी खास स्वत:च्या हाताने विणलेल्या हातमाग वस्त्रांनादेखील तेवढीच, नव्हे त्यापेक्षा अधिक मागणी आहे. स्त्री-पुरुषांना परिधान करण्यासाठी लागणारे वस्त्र, विविध प्रकारच्या कॉटन आणि सिल्कच्या साड्या, शेले, मफलर, धोती, टॉवेल, गालिचे, चादरी, सतरंज्या, ब्लँकेट, चटया तसेच विणकाम करून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्त्रांचा अंतर्भाव हातमाग या संज्ञेअंतर्गत होतो. देशातील बहुतांश हातमाग व्यावसायिक हे ग्रामीण भागात काम करीत असून, गरिबीच्या रेषेखाली जीवन जगत आहेत. कष्टकरी हातांनी तयार केलेल्या या वस्तूंना भारतीय बाजारपेठेप्रमाणेच इतर देशातील बाजारपेठांमध्येदेखील मागणी वाढत आहे. हातमाग व्यवसाय चालविणाऱ्या या कष्टकऱ्यांनी देशाला एक वेगळी ओळख दिली आहे. दिवस-रात्र एक करून कष्ट करणाऱ्या या अनंत हातांना चालना मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता दरवर्षी ७ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. दरवर्षी या विशेष दिनी देशातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या हातांना संत कबीर तथा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.