रेणापूर : तालुक्यातील ६६ गावांतील २३ हजार ९२७ कुटुंबांपैकी केवळ १२ हजार ४५७ कुटुंबांकडेच स्वच्छतागृहे असल्याची माहिती निदर्शनास आली आहे़ त्यामुळे तालुक्यातील गावे निर्मलग्राम योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़शासनाच्या वतीने गाव पाणंदमुक्त व निर्मल करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु, तालुक्यातील बहुतांशी गावांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे़ तालुक्यात ६६ गावे असून २३ हजार ९२७ कुटुंबे आहेत़ त्यापैकी केवळी १२ हजार ४५७ कुटुंबाकडे स्वच्छतागृहे आहेत़ उर्वरित ११ हजार ४७० कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गावनिहाय कुटुंबांतील स्वच्छतागृहांची आकडेवारी व कंसात स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे- आनंदवाडी ६८ (७२), आंदलगाव १४५ (६), आरजखेडा ७२ (१४०), असराचीवाडी २५ (९१), बावची २८ (१६३), भंडारवाडी १२३ (६१), भोकरंबा २७४ (२६५), बिटरगाव ५७ (३२५), चाडगाव १२२ (५५), दर्जी बोरगाव ९० (३२८), धवेली ४३ (१५६), डिगोळ देशमुख १३६ (२८३), दिवेगाव १०६ (३१), फरदपूर ५८ (१५५), गरसुळी ८२ (२४८), गव्हाण ११० (८२), घनसरगाव १५८ (२८१), गोढाळा १९२ (२३५), हारवाडी १४८ (२३६), व्हटी १९२ (७५), इंदरठाणा १२८ (८६), इटी २३२ (३८), जवळगा १२९ (३०४), कामखेडा १९८ (२९७), कारेपूूर २६८ (३८५), खलंग्री १२३ (१२०), खरोळा ५३६ (६१८), कोळगाव ११४ (११०), कोष्टगाव १३९ (५८०), कुंभारवाडी १६८ (४९), माकेगाव ७९ (१६३) माणूसमारवाडी १२२ (१६५), मोहगाव ११९ (६०), मोरवाड २६९ (५१), मोटेगाव २०६ (२०९), मुरढव १४६ (१३७), मुसळेवाडी १५३ (१०१), नरवटवाडी ३६ (३३), निवाडा १३८ (१९५), पळशी १६८ (३४), पानगाव ५६३ (११५२), फावडेवाडी १७८ (९१), पोहरेगाव ६३६ (४६१), रामवाडी १८० (११), रामवाडी (पा.) ६० (२८), रेणापूर २३१६ (९९४), समसापूर १२० (१५२), सांगवी १४९ (१४१), सारोळा १०३ (९१), सय्यदपूर १०९ (४०), शेरा १३३ (१३७), सिंधगाव १८८ (२६४), सुमठाणा १४४ (७९), टाकळगाव ८४ (१०४), तळणी १७८ (२००), तत्तापूर १४६ (१२२), वाला २१४ (३४), वांगदरी १०३ (२०५), वंजारवाडी १५२ (५८), यशवंतवाडी ३८ (७८) अशी आहे़ निर्मलग्राम योजनेतून स्वच्छतागृह बांधलेल्यास शासनाच्या वतीने प्रत्येकी ४ हजार ६०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे़कोट़़़तालुक्यातील गावे निर्मल ग्राम व्हावीत म्हणून पंचायत समितीच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत़ त्यास अल्प प्रतिसाद आहे़ तो वाढावा म्हणून कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे पंचायत समितीतील स्वच्छता विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले़
निम्म्या कुटुंबाकडेच वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्मलग्रामकडे दुर्लक्ष : मोठ्या गावांतील नागरिकांकडून टाळाटाळ
By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST