शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा गुंता सुटता सुटेना!

By admin | Updated: September 8, 2015 04:10 IST

केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागले आहे. राज्यसभेत जीएसटीवर काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याकरिता अर्थमंत्री अरुण जेटली

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्र सरकार वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागले आहे. राज्यसभेत जीएसटीवर काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याकरिता अर्थमंत्री अरुण जेटली हे मुख्य विरोधी पक्षाचे नेते आणि माजी व्यापारमंत्री आनंद शर्मा यांच्या माध्यमाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु काँग्रेस मात्र या मुद्यावर आपली भूमिका सोडायला तयार नाही.जीएसटीवर काँग्रेस जे विधेयक आणू इच्छित होती त्याला भाजपने विरोधी पक्षात असताना सातत्याने विरोध केला आणि आता सत्तेत आल्यानंतर अखेर या पक्षाला तेच विधेयक आणावे लागले हे जनतेच्या लक्षात आणून द्यायचे अशी पक्षाची रणनीती आहे. सोबतच हे विधेयक पारित करण्यास पक्षाने अडथळा आणला असे संकेतही काँग्रेसला द्यायचे नाहीत. जीएसटीच्या मंजुरीसाठी काँग्रेसने सरकारसमक्ष तीन अटी ठेवल्या आहेत. अडचण अशी आहे की, सरकारला काँग्रेसच्या या अटी मान्य नाहीत. या अटी मान्य करणे म्हणजे काँग्रेसच्या जुन्या जीएसटी विधेयकाचे समर्थन ठरेल, असे सरकारला वाटते आणि याच कारणामुळे संसदेच्या प्रवर समितीच्या बैठकीत सरकारने काँग्रेसच्या सूचना फेटाळल्या होत्या. परिणामी काँग्रेसने आपला विरोध नोंदविला. जीएसटी आमचे विधेयक आहे. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही; परंतु या सरकारच्या लंगड्या विधेयकाचे समर्थन कसे करणार? असा सवाल आनंद शर्मा यांनी उपस्थित केला.