शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

लोकसभेत जीएसटी मंजूर!

By admin | Updated: March 30, 2017 05:07 IST

करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकावर सात तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर

नवी दिल्ली : करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकावर सात तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर लोकसभेच्या मंजुरीची मोहर उमटली. हे वित्त विधेयक असल्याने याला राज्यसभेची मंजुरी लागणार नाही, वरिष्ठ सभागृहात यावर केवळ चर्चा होईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे हे विधेयक मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. १ जुलैपासून ही नवी कररचना लागू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीशी संबंधीत चार विधेयके लोकसभेत मांडली आणि त्यानंतर त्यावर सात त्यावर घमासान चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय जीएसटी, एकिकृत जीएसटी, केंद्रशासित प्रदेश जीएसटी व राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईचे विधेयक अशी चार विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. चर्चेला उत्तर देताना जेटली म्हणाले की, या नव्या करव्यवस्थेत राज्य सरकारे आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले जाईल, तसेच कृषी क्षेत्रावर कोणताही कर लावला जाणार नाही. सध्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी करांवर कर आहेत. नवीन करप्रणालीमुळे एकच कर असेल आणि त्यामुळे अनेक वस्तू काही अंशी स्वस्त होतील. वस्तू कोण वापरणार त्यानुसार त्यावर जीएसटी किती लावायचा हे ठरेल. ही कररचना लागू झाल्यानंतर व्यापारी-व्यावसायिकांची विविध अधिकाऱ्यांकडून होणारी गळचेपी पूर्णपणे बंद होईल आणि भारतात एक देश एक कर अशी प्रणाली कार्यरत होईल. या विधेयकांवर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी (पान ११ वर)निर्णय घेण्याचे अधिकार जीएसटी कौन्सिलकडे वस्तू व सेवा कर देशाच्या अर्थकारणात क्रांतीकारी बदल घडवणारे महत्वाचे पाऊल आहे. केंद्र व राज्य सरकारांना या कराची अमलबजावणी करण्याचे अधिकार असून भारताच्या संघराज्य व्यवस्थेचा सन्मान करीत जीएसटीशी संबंधित सारे महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार जीएसटी कौन्सिलकडे सोपवण्यात आले आहेत. जीएसटी विधेयक अमलात आणल्यानंतर पहिल्या पाच वर्षात ज्या राज्य सरकारांना महसुली उत्पन्नात तोटा सहन करावा लागेल, त्यांना पुरेशी नुकसान भरपाई देण्याची तरतूद विधेयकात आहे.  जीएसटी विधेयकामुळे देशात चलनवाढीचा धोका निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. भाजपाच्या विरोधामुळे देशाला १२ लाख कोटींचा फटकासंयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने हे विधेयक आणले त्यावेळी भाजपानेच विरोध केला होता. त्यांच्या विरोधामुळे भारताचे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. जीएसटी कायद्याची संकल्पना मूलत: युपीए सरकारची आहे.जीएसटी कराची नेमकी टक्केवारी किती? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सरकारकडे वस्तू व सेवानिहाय भिन्न दरांचे प्रस्ताव आले आहेत. 0 टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के व २८ टक्के असे त्याचे ठळक स्तर (स्लॅब) आहेत. जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर 0 टक्के जीएसटी तर चैनीच्या वस्तू व सेवांवर २८ टक्के जीएसटी आकारला जाईल.