शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाराच्या विकासासाठी जीएसटी उपयुक्त शर्मा: महाराष्ट्र चेंबर आयोजित चर्चासत्र उत्साहात

By admin | Updated: October 1, 2016 23:04 IST

नाशिक : पुढील वर्षी १ एप्रिलपासून जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर अमलात येणार असून ही कर प्रणाली अत्यंत सुटसुटीत असल्याने व्यापार उद्योगाला पोषक ठरेल, असे मत केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा यांनी व्यक्त केले.

नाशिक : पुढील वर्षी १ एप्रिलपासून जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर अमलात येणार असून ही कर प्रणाली अत्यंत सुटसुटीत असल्याने व्यापार उद्योगाला पोषक ठरेल, असे मत केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या यांच्या वतीने आयोजित वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होेते. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, विक्रीकर सहआयुक्त एच. ए. बाकरे, चेंबरच्या कर समितीचे चेअरमन सतीश बुब उपस्थित होते.जीएसटीचा कायदा मंजूर झाला आहे. परंतु त्याबाबतचे नियम जीएसटी कौन्सिल बनविणार आहे. दीड कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर राज्य सरकारचे नियंत्रण असेल, त्यापुढील व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित असतील. कराचे दर साधारणत: १८ ते २० टक्के असतील तसेच नोंदणी, रिटर्न या सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यात सुसूत्रता असेल, असे सांगून शर्मा यांनी ज्या वस्तूंना व्हॅट खाली सूट आहे, त्या सवलती जीएसटीत कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले. चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी व्यापारी आणि उद्योजकांना करात सुलभता हवी असल्याचे सांगितले. व्हॅट लागू करताना ज्या पद्धतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विक्री विभागाला बरोबर घेऊन नागरिकांना माहिती दिली. त्याच पद्धतीने जीएसटीबाबतही सहकार्य राहील, असे चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. यावेळी सेंट्रल एक्साइजचे उपआयुक्त प्रथमेश रेधनाम, सहायक आयुक्त गिरीश वेदसरी व डॉ. पी. के. राऊत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जीएसटीची माहिती दिली. यावेळी सतीश बुब यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केले. आभार सतीश बुब यांनी मानले. यावेळी प्रदीप कोर्डे, यू. के. शर्मा, भावेश माणेक, राजेश मालपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.छायाचित्र आर फोटोवर ३० चेंबर नावाने सेव्ह आहे. ओळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात बोलताना केंद्रीय उत्पादन शुल्कचे आयुक्त आर. पी. शर्मा. समवेत व्यासपीठावर सतीश बुब, अनिलकुमार लोढा, संतोष मंडलेचा, एच. ए. बाकरे आदि.