शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोलाणीत दगडफेक, दंगलीच्या अफवेने पळापळ एक जण जखमी : एका गटाच्या तरुणांकडून दुकानांवर तुफान दगडफेक, मार्केट क्षणात झाले बंद

By admin | Updated: June 24, 2016 21:08 IST

जळगाव: सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे भावना दुखावल्याच्या कारणावरुन शंभर ते दीडशे जणांच्या एका गटाने एकत्र येऊन गोलाणी मार्केटमध्ये घोषणाबाजी करत शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता दुकानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दंगलीची अफवा पसरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ झाली. दुकानदारांनी क्षणात आपआपली दुकाने बंद केली. दगडफेकीत उज्ज्वल पद्माकर शुक्ल (वय ४५ रा.धरणगाव) यांच्या डोक्याला दगड बसल्याने ते जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव: सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे भावना दुखावल्याच्या कारणावरुन शंभर ते दीडशे जणांच्या एका गटाने एकत्र येऊन गोलाणी मार्केटमध्ये घोषणाबाजी करत शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता दुकानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दंगलीची अफवा पसरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ झाली. दुकानदारांनी क्षणात आपआपली दुकाने बंद केली. दगडफेकीत उज्ज्वल पद्माकर शुक्ल (वय ४५ रा.धरणगाव) यांच्या डोक्याला दगड बसल्याने ते जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
धार्मिक भावना दुखावल्याचा आक्षेपार्ह व्हीडीओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अजिंठा चौकात रास्ता रोको व दगडफेक झाली होती. त्या घटनेत दोषी असलेल्यावर कारवाई करावी यासाठी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे पाचशेच्यावर जमाव जमला होता. त्यानंतर काही वेळातच शंभर ते दीडशेजण रिक्षा व दुचाकीने गोलाणी मार्केटमध्ये आले. शिवाजी पुतळ्याच्या रस्त्याच्या दिशेकडून हे तरुण घोषणाबाजी करून गोलाणीत शिरले. दिसेल त्या दुकानात दगडफेक व सामानाची नासधूस करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. प्रत्येकाने आपआपली दुकाने बंद केली. पहिल्या मजल्यावरील साई सागर या दुकानाचे बॅनर फाडून बाहेर चहाच्या टपरीचालकाला मारहाण केली. त्याच्या दुकानातील सामान व फोटो रस्त्यावर फेकून दिले.
धावपळ, पळापळ अन् धरपकड
काय प्रकार सुरु आहे, हे कोणालाच कळत नव्हते. दंगलीची अफवा मात्र वेगाने पसरली होती. घटनेचे वृत्त कळताच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी गोलाणीत धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व नियंत्रण कक्षातून आरसीपी तसेच कमांडो पथक दाखल झाले. पोलिसांचा ताफा पाहताच गोंधळ घालणारे पळत सुटले. पोलिसांनी धरपकड करुन काही संशयितांना ताब्यात घेतले.सर्व दुकानदारांनी दुकाने बंद करुन कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस स्टेशनसमोर जमाव
दगडफेक करुन गोंधळ घालणार्‍यांना पकडून आणल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शेकडो जण पोलीस स्टेशनला आले होते. जमावाला पांगवतांना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी अनेक जणांनी पोलिसांशी वाद घातला. पोलीस स्टेशनला गर्दी होत असताना दुसरीकडे पुन्हा दगडफेक झाल्याची अफवा पसरविली जात होती.