शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By admin | Updated: November 18, 2015 00:57 IST

सोलापूर:

सोलापूर:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांसह प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यंत्रमाग कामगार सेना
पूर्व भागात कुचननगर येथे महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत विडी व यंत्रमाग कामगार सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास चिलवेरी यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांनी केले. यावेळी पद्मा म्हंता, विठ्ठल कुर्‍हाडकर, दशरथ नंदाल, किशोर नादरगी, पप्पू शेख, अंबादास कैरमकोंडा, प्रशांत जक्का, गणेश म्हंता, श्रीनिवास बोगा, लक्ष्मीबाई ईप्पा, लक्ष्मीबाई चिलवेरी, लक्ष्मी बोल्लू, मीराबाई लच्छुवाले, मुमताज सय्यद, गौरी पल्ले, रिहाना शेख, पार्वतीबाई पंदिला, कमलाबाई गुंडेटी, अनुराधा साखरे, वीणा गणेश, अश्विनी चिकणी, अर्चना चिलका, हरी दुध्याल, नागार्जुन कुसूरकर, श्रीहरी साका, विशाल चिलवेरी, विक्रम कारमपुरी, गुरुनाथ कोळी, व्यंकटेश मिठ्ठा, साई गायकवाड, लक्ष्मीकांत कोडम आदी उपस्थित होते.
सोलापूर शहर शिवसेना
सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने उत्तर कसबा चौपाड येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब अमर रहे, एकच साहेब बाळासाहेब अशा घोषणा देऊन जिल्हा उपप्रमुख सदानंद येलुरे, सुनील शेळके, विजय पुकाळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सचिन खुर्द, रिक्षा सेना उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी बाळासाहेबांना वंदन केले. याप्रसंगी सागर रेळेकर, संदीप उजळंबे, राजू घोडके, सतीश कदम, सतीश शेळके, महादेव घुले, अनिल इंगळे, माधव मुळे, अमित पवार, शुभम मदले, बजरंग धायगुडे, अजय म्हमाणे, दिनेश सुरवसे, अशोक लोहार, बसवराज शिवशरण, अनिल इंगळे, नाना कळसकर, सतीश बोरकर, माणिक कोळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
वल्लभभाई पटेल शिवजन्मोत्सव मंडळ
सोलापूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सचिन डोईजोडे, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, खजिनदार नरेश चव्हाण, तानाजी डोईजोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.