शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या पाचूने नटलेले नयनरम्य ठिकाण

By admin | Updated: January 18, 2017 05:24 IST

स्वर्गाची सफर करायची असेल तर धर्मशाला येथे येऊन धौलाधार पर्वतराजी जरूर पाहा.

धर्मशाला : स्वर्गाची सफर करायची असेल तर धर्मशाला येथे येऊन धौलाधार पर्वतराजी जरूर पाहा. निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर स्वर्गाहून कमी नाही. चोहीकडे हिरवीगार वनराई, पाम वृक्षांनी डवरलेले डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. धर्मशाला हे हिमाचल प्रदेशातील इतर शहरांहून अधिक उंचावर वसलेले असून, निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षणांचा आनंद लुटण्यासाठी हे सर्वात चांगले ठिकाण आहे. योगा, विपश्यना, निसर्गोपचार, स्पा याशिवाय कँप फायर, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचाही येथे आनंद घेता येतो. धर्मशाळा म्हणजे दलाई लामा यांचे निवासस्थान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विजनवासातील तिबेटी सरकारचे हे मुख्यालय आहे. चीनने तिबेटचा कब्जा केल्यानंतर तिथून बाहेर पडलेल्या तिबेटी जनतेने दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली इथे हे सरकार स्थापन केले. त्यामुळे इथे तिबेटी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.धर्मशालाच्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये त्रियुंडचा समावेश आहे. पर्वताच्या शिखरावर वसलेल्या त्रियुंडला धर्मशालाचे मुकुट म्हटले जाते. त्रियुंडच्या पुढे इंद्रहार ग्लेशियर आहे. मॅक्लोडगंज येथून २ कि.मी. पुढे भागसुनाग मंदिर आहे. येथून जवळच स्नानासाठी तयार करण्यात आलेला तलाव आणि धबधबा आहे. धर्मशाला येथून ११ कि.मी.वर नड्डी गावात डल सरोवर आहे. गिर्यारोहक या सरोवरचा तळ छावणी म्हणून उपयोग करतात. या सरोवरात स्नान केल्यास सर्व दु:ख दूर होते, अशी श्रद्धा आहे. या सरोवराजवळ एक मंदिर असून ते दूर्वास ऋषींना समर्पित आहे. करेरी हे ठिकाण सर्वांत सुंदर पिकनिक पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे. अल्पाईन हिरवळ आणि देवदारच्या जंगलाने वेढलेले हे ठिकाण ठिकाण आहे. धर्मकोट : भागसुनागजवळच धर्मकोट हे गाव आहे. धर्मकोटला मिनी इस्रायलही म्हटले जाते. या गावात तुम्हाला विदेशी आणि इस्रायली लोकच सर्वाधिक भेटतील.