शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना अनुदान

By admin | Updated: June 5, 2015 23:53 IST

कमी पावसाचा परिणाम पिकांवर झाल्यास सरकार शेतकऱ्यांना डिझेल, वीज आणि बियाणांसाठी अनुदान देईल.

नवी दिल्ली : कमी पावसाचा परिणाम पिकांवर झाल्यास सरकार शेतकऱ्यांना डिझेल, वीज आणि बियाणांसाठी अनुदान देईल. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या विभागाने मान्सूनबद्दल गेल्या आठवड्यात केलेल्या सुधारित भाकितानुसार तो अपुरा असेल. या भाकितानंतर दुष्काळाची भीती व्यक्त होत आहे. बैठकीला वीज, जलस्रोत, ग्रामीण विकास, अन्न आणि खते मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. दुष्काळसदृश परिस्थितीला गेल्यावर्षी ज्या पद्धतीने तोंड दिले त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे बैठकीनंतर सिंह यांनी सांगितले.दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागात संपर्क अधिकारी नेमण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षीही एक लिटर डिझेलमागे १० रुपयांचे अनुदान दिले जाऊ शकते. वेगवेगळ््या योजनांखाली बियाणांवर ५० टक्के अनुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल.दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारची ५८० जिल्ह्यांसाठी योजना तयार असल्याचे सिंह यांनी नुकतेच सांगितले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न अबाधित राहावे यासाठी यावर्षी नवी विमा योजना आणली जाईल. देशातील डाळींच्या पुरवठ्यात अडथळे येऊ नयेत व त्यांच्या किमतीही नियंत्रणात असाव्यात यासाठी डाळींची आयात केली जाईल. हवामान खात्याने २ जून रोजी केलेल्या भाकितानुसार दीर्घ कालावधीच्या सरासरीत पाऊस ९३ टक्क्यांवरून ८८ टक्के होईल, असे म्हटले होते. उत्तर-पश्चिम भारताला पावसाचा मोठा फटका बसेल. ४गेल्या वर्षी १२ टक्के पाऊस कमी झाल्यामुळे तेलबिया, कापूस व धान्याला फटका बसला होता. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात कृषी आणि त्याच्याशी संबंधित विभागांची वाढ केवळ ०.२ टक्केच झाली होती.४अन्नधान्याचे उत्पादन २०१४-२०१५ या पीक वर्षात (जुलै-जून) २५१.१२ दशलक्ष टन झाले होते. ते त्या आधीच्या वर्षात विक्रमी २६५.०४ दशलक्ष टन होते.