ग्रामपंचायत पोटनिवडणुकांची लगबग सुरू
By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST
अकोला: जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, संबंधित गावांमध्ये लगबग सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकांची लगबग सुरू
अकोला: जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, संबंधित गावांमध्ये लगबग सुरू झाली आहे.ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक स्थगित करण्यात आली असली तरी मे ते जून या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे मतदान २२ एप्रिल रोजी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया ३१ मार्चपासून सुरू झाली असून, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची मुदत ७ एप्रिलपर्यंत आहे. त्यानुषंगाने या पोटनिवडणुकीची लगबग सुरु झाली आहे.