शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घुमली नामाची गुरुवाणी

By admin | Updated: April 4, 2015 05:20 IST

आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले

अविनाश थोरात, घुमान (संत नामदेव नगरी)आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले, अशी टीका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केली. तब्बल १५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या भव्य सभामंडपात महाराष्ट्र आणि पंजाबमधील अनुबंधाचा हा अनोखा सोहळा थाटात सुरू झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संमेलनाचे संयोजक ‘सरहद’चे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मावळते संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपुर्द केली. ‘पुंडलिक वरदा’, असे म्हणत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी घुमान, पंजाब व महाराष्ट्राचा अनुबंध विस्ताराने उलगडला. नाचणे व वाचण्यात भेद नाही. ज्ञान व आनंदात द्वंद्व नसते. त्यामुळे साहित्याचा उत्सव करण्यात गैर नाही. वारकरी संप्रदायाचे साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. नामदेवांच्या नगरीत होत असलेले हे संमेलन गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.