शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँक घटविणार सरकारचा लाभांश

By admin | Updated: February 23, 2017 05:04 IST

नोटाबंदी केल्यामुळे बँकांत जमा न होऊ शकणाऱ्या काळ्या पैशाच्या बदल्यात मोठा

हरीश गुप्ता / नवी दिल्लीनोटाबंदी केल्यामुळे बँकांत जमा न होऊ शकणाऱ्या काळ्या पैशाच्या बदल्यात मोठा लाभ रिझर्व्ह बँकेकडून मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेने जोरदार झटका दिला आहे. वाढीव लाभ तर राहोच; पण सरकारला रिझर्व्ह बँकेकडून मिळणारा नेहमीचा लाभांशही तब्बल ८ हजार कोटी रुपयांनी कमी होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने सरकारला कळविले आहे. आगामी वित्त वर्षात आपणाकडून ५८ हजार कोटींचा लाभांश दिला जाईल, असे  संकेत रिझर्व्ह बँकेने सरकारला दिले आहेत. गेल्यावर्षी ६५,८७६ कोटींचा लाभांश देण्यात आला होता. याचाच अर्थ लाभांशात तब्बल ८ हजार कोटी रुपयांची घट होणार आहे.नोटाबंदी केली, तेव्हा सरकारचा असा अंदाज होता की, चलनात मोठ्या प्रमाणात काळा पैसा असल्याने चलनातील सर्वच रक्कम बँकांत जमा होणार नाही. जेवढी रक्कम जमा होणार नाही, तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळेल. हा आकडा काही दोन ते तीन लाख कोटी असेल, असे सरकारचे मत होते. तथापि, असे काहीही घडले नाही. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँकेकडे जवळपास १५.५१ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. अनिवासी भारतीय ३१ मार्चपर्यंत नोटा भरू शकतात. याशिवाय नेपाळ आणि अन्य शेजारी राष्ट्रांकडूनही नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर नोटाबंदीतून काही रक्कम मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. उलट त्यातून नुकसानच होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीतून लाभ मिळणे तर दूरच नेहमीच्या लाभांशातही रिझर्व्ह बँक ८ हजार कोटींची कपात करणार आहे. आदल्या वर्षीच्या तुलनेत लाभांशातील ही घट १३ टक्के आहे. नोटाबंदीतूनही लाभांशाची अपेक्षा नाही२0१७-१८ या वित्त वर्षात नोटाबंदीमधून कोणताही विशेष लाभांश सरकारला मिळण्याची अपेक्षा नाही.नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या समस्या उलट वाढल्या आहेत. नव्या नोटा छापण्यावर रिझर्व्ह बँकेचा १५ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.