शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा माफी‘योग’

By admin | Updated: June 22, 2015 23:54 IST

योग दिनाच्या कार्यक्रमाचे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण नसल्यामुळे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अनुपस्थित राहिले; मात्र त्यामागच्या कारणांची शहानिशा

नवी दिल्ली : योग दिनाच्या कार्यक्रमाचे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण नसल्यामुळे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अनुपस्थित राहिले; मात्र त्यामागच्या कारणांची शहानिशा न करताच भाजपचे टिष्ट्वटबहाद्दर सरचिटणीस राम माधव यांनी केलेले विधान अंगलट येऊ लागताच सरकारने सपशेल माफीनामा जाहीर केला आहे. राम माधव यांच्या टिष्ट्वटरवरील शेरेबाजीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच सरकारच्या माफीनाम्यावर समाधान न मानताच काँग्रेसने भाजप व सरकारवर विघटनवादी राजकारणाचा आरोप केला आहे.राम माधव यांनी खरी परिस्थिती समोर आल्यानंतर वादग्रस्त टिष्ट्वट मागे घेत माफी मागितली. सरकारनेही सारवासारव करीत चुकीची कबुली दिली असली तरी काँग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरत हा वाद पुरता संपला नसल्याचे संकेत दिले आहेत.राजशिष्टाचारामुळे अन्सारी यांना योग कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा खुलासा लगेचच सरकारने केला. पंतप्रधान एखाद्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतील तर राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना निमंत्रित केले जाऊ शकत नाही, कारण प्राधान्यक्रमानुसार दोघांचेही वरचे स्थान आहे, असे आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. अनभिज्ञतेतून ते घडले. आम्ही त्यासाठी माफी मागतो. ती चूक होती, माधव यांनी ती मान्य करीत आपले विधान मागे घेतले आहे, असे सांगत नाईक यांनी वादाला महत्त्व देण्याचे टाळले. संबंधित मंत्र्याचे विधान तर्कसंगत असल्यामुळे हे प्रकरण आमच्यासाठी येथेच संपले असल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने निवेदनात नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)