शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘कडवट’ सरकार!

By admin | Updated: June 24, 2014 02:48 IST

रेल्वे भाडेवाढीच्या धक्क्यातून अजून सावरू न शकलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पुढय़ात मोदी सरकारने महागाईचे आणखी एक ताट वाढून ठेवले आहे.

साखरेच्या आयात शुल्कात वाढ : प्रतिकिलो पाच रुपयांनी महागणार
रेल्वे भाडेवाढीच्या धक्क्यातून अजून सावरू न शकलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पुढय़ात मोदी सरकारने महागाईचे आणखी एक ताट वाढून ठेवले आहे. त्यातून जनतेला लवकरच महागाईचा मेगाशॉक बसणार आहे. सोमवारी सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने पाच रुपयांनी साखर तर कडू झालीच, पण त्यापाठोपाठच 
भाज्यांचे दरही दुपटीने वाढल्याने आणि आता चालू आठवडय़ात इंधन दरवाढ होणो अपरिहार्य असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे.
 
विश्वास पाटील - कोल्हापूर
केंद्रातल्या मोदी सरकारने सोमवारी साखरेचे आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 4क् टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने साखरेची गोडी प्रतिकिलो पाच रुपयांनी कडू होणार आहे. रेल्वे भाडेवाढीपाठोपाठ सरकारच्या या दुस:या ‘कडवट’ निर्णयाने सर्वसामान्यांचा घोटभर चहाही कडू झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 
केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असले, तरी साखरेवरील आयात शुल्क वाढविल्यामुळे खुल्या बाजारातील दर क्विंटलमागे 55 रुपयांनी वाढून तो 2,855 रुपयांर्पयत गेले आहे. साखरेचे दर तातडीने वाढणार असले तरी दीर्घकालीन विचार करता साखरेचे दर स्थिरावतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. गेल्या हंगामातील 9क् लाख टन साखर शिल्लक आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात 242 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याशिवाय 18 लाख टन कच्ची साखर आयात झाली होती. देशाची वार्षिक गरज 23क् लाख टन असल्याने त्या तुलनेत साखर जास्त शिल्लक असल्याने दर घसरले होते. परंतु आजच्या निर्णयामुळे दर स्थिर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त झाली.  
साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेशमधील कारखान्यांचे 8 हजार कोटी रुपये व कर्नाटकातील कारखान्यांचे 36क् कोटी रुपये एफआरपीची बिले देय आहेत. या दोन राज्यांनाच या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील यंदाच्या हंगामात सुरू असलेल्या 156 पैकी आठच कारख्यान्यांचे 17क् कोटी रुपये किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देय आहे. त्याच कारखान्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
 
‘अच्छे दिन’ला महागाईचे इंधन !
अर्थव्यवस्थेला कडू औषधाचा डोस हवा असल्याचा तर्क मांडत केंद्र सरकारतर्फे चालू आठवडय़ात महागाईच्या आगीत तेल ओतणारा आणखी एक निर्णय होणार आहे. हा निर्णय आहे नैसर्गिक वायूच्या किमतीमधील वाढीचा.
 
तेल व वायू उत्खननासाठी सध्या असलेल्या 4.2 दशलक्ष अमेरिकी 
डॉलर प्रति ब्रिटिश थर्मल युनिट दरामध्ये दुपटीने वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय सरकारकडे नसल्याने 
याची परिणती महागाई वाढण्यात होईल.
 
असा निर्णय झाल्यास विजेच्या दरात प्रति युनिट 45 पैसे, खते टनामागे 1,37क् रुपये तर सीएनजी गॅस किलोमागे दोन रुपये 81 पैशांनी महागेल. तर याच तुलनेत पाइपगॅसची किमतही वाढणो अपेक्षित आहे. सीएनजी महागल्यास प्रवासखर्चही वाढेल. 
 
भाजीपाला महागला
गेल्या तीन महिन्यांत फ्लॉवर चारपट, कोबी तीनपट तर कांद्यासह इतर प्रमुख भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला असून भाजपाने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थिर असलेले बाजारभाव गेल्या तीन महिन्यांत मोठय़ा प्रमाणात वाढले.