शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सरकार भरणार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता

By admin | Updated: January 21, 2017 05:19 IST

भारतातल्या २७ कोटी ‘जन धन’ बँक खातेदारांसाठी एक शुभवर्तमान आहे.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- भारतातल्या २७ कोटी ‘जन धन’ बँक खातेदारांसाठी एक शुभवर्तमान आहे. देशातल्या गरीब वर्गाची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जनधन खातेधारकांना पुढल्या ३ वर्षांपर्यंत २ लाखांचा विमा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बहुधा अर्थसंकल्पात ही घोषणा अर्थमंत्री करतील, अशी शक्यता आहे.देशात २७ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी १६ कोटी खाती आधार कार्डाशी संलग्न आहेत. नव्या विमा योजनेनुसार अपघात व जीवन अशा दोन्ही प्रकारच्या विम्याचा लाभ विनामूल्य देण्याचे सरकारने ठरवले तर किमान ९ हजार कोटींचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. अशा कोणत्या योजनेचा गरिबांना अधिकाधिक लाभ देता येऊ शकेल, याचा विचार सरकारी स्तरावर गांभीर्याने सुरू आहे. या योजनेत विमाधारकाच्या ३ वर्षांच्या विमा प्रीमियमची पूर्ण रक्कम सरकार भरणार आहे.केंद्र सरकारने २0१४ साली पंतप्रधान सुरक्षा विमा योजना(पीएमएसबीवाय) वार्षिक हप्ता १२ रुपये, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) वार्षिक हप्ता ३३0 रुपये व अटल पेन्शन योजना (एपीवाय) अशा सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना सुरू केल्या. >निर्णय विचाराधीनअर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ३.0६ कोटी लोक पीएमजेजेबीवाय योजनेशी व ९.७२ कोटी लोक पीएमएसबीवाय योजनेशी जोडले गेले आहेत. त्यात अपघात व अपंगत्व अशा दोन्ही प्रकारांत विम्याचा लाभ समाविष्ट आहे. विमाधारकाला २ लाख रुपयांचा विमा दोन्ही प्रकारात मिळतो. तरीही भारतात जीडीपी व विम्याचे हप्ते यांचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली ते अवघे ३.४४ टक्के होते. सामाजिक सुरक्षेसाठी हे प्रमाण वाढले पाहिजे, या हेतूने नवा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती आहे.