शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत शुक्रवारी खादीचा पोषाख ?

By admin | Updated: March 10, 2016 04:02 IST

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या

नवी दिल्ली : सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या फायद्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा एक भाग म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी खादीचे कपडे परिधान करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करावे, अशी विनंती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आयोगाच्या या विनंतीवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.‘देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे परिधान करावेत,’ असे आवाहन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी केले आहे. तथापि खादीचा पोषाख परिधान करणे ऐच्छिक असेल. खादीची विक्री वाढविण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. प्रत्येकाने खादीचा एक पोषाख जरी खरेदी केला तरी विक्री किती वाढेल, असा त्याचा उद्देश आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्याचे प्रतिपादन अनेकदा केले आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली आहे. देशात केंद्र सरकारचे ३५ लाख कर्मचारी असून, त्यात रेल्वे व संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना समावेश नाही. आठवड्यातून एक दिवस खादी परिधान करण्याची कल्पना फार चांगली असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. काही अधिकारी सध्या खादीचे कपडे घालतात, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र कपड्यांबाबत सरकारने सक्ती करू नये, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरुपांचे कपडे वा महिलांच्या साड्या वा पंजाबी सुट विकत घेणे, त्यांना स्टार्च घालणे, इस्त्री करणे खर्चीक असल्याची तक्रार काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, फॅब इंडिया आणि रेमंड यांसारख्या कंपन्यांशी खादी आणि ग्रामोद्योग आयोग करार करीत आहे. या करारानंतर अशा कंपन्यांच्या शोरूममध्ये खादीचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. (वृत्तसंस्था)