शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कंपन्यांना भांडवल विक्रीची सक्ती

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST

किमान 25 टक्के भांडवल जाहीर विक्रीद्वारे लोकांना उपलब्ध करून देण्याची सक्ती करणारा नवा नियम ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) या बाजार नियंत्रक संस्थेने लागू केला आहे.

नवी दिल्ली : शेअर बाजारांमध्ये नोंदणी झालेल्या सर्व सार्वजनिक उपक्रमांनी (सरकारी कंपन्या) येत्या तीन वर्षात त्यांच्या एकूण भागभांडवलापैकी किमान 25 टक्के भांडवल जाहीर विक्रीद्वारे लोकांना उपलब्ध करून देण्याची सक्ती करणारा नवा नियम ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) या बाजार नियंत्रक संस्थेने लागू केला आहे.
 म्हणजेच शेअर बाजारात नोंदलेल्या कोणत्याही सरकारी कंपनीमध्ये तीन वर्षाच्या अखेरीस सरकारी भागभांडवल 75 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकणार नाही, असा या निर्णयाचा दुसरा अर्थ आहे. ज्यात सरकारी भांडवल 75 टक्क्यांहून जास्त आहे अशा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एकूण 38 सार्वजनिक उपक्रमांच्या कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली असून त्यांच्या शेअर्सचे बाजारात व्यवहार होतात. या उपक्रमांनी किमान 1क् टक्के भाग भांडवल जनतेला उपलब्ध करून देण्याची सेबीची सक्ती होती. ही मर्यादा आता 25 टक्क्यांर्पयत वाढविण्यात आली असून त्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
शेअर्सच्या प्राथमिक बाजारातील लोकांचा सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल, असे इतरही अनेक नव्या उपायांना सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘ऑफर फॉर सेल’ या मार्गाने केल्या जाणा:या कंपन्यांच्या शेअर विक्रीमध्ये 1क् टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्याचाही यात समावेश आहे. अशा गुंतवणूकदारांना कंपन्या शेअर्सच्या खरेदी किमतीत सवलतही देऊ शकतील.
नव्या निर्णयानुसार या 38 सार्वजनिक उपक्रम कंपन्यांमधील 75 टक्क्यांहून अधिक असलेले स्वत:चे भागभांडवल सरकारला इतरांना विकावे लागेल. अशा निर्गुतवणुकीतून येत्या तीन वर्षात सरकारला 6क् हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
ज्या सार्वजनिक उपक्रमांना हा नवा नियम लागू होईल त्या कंपन्या व त्यांमधील सध्याची सरकारी भांडवलाची टक्केवारी अशी : कोल इंडिया (89.65), स्टील अॅथॉरिटी आणि एमएमटीसी( प्रत्येकी 9क्), एनएचपीसी व हिंदुस्तान कॉपर (9क्), न्येवेली लिग्नाईट (9क्) आणि एसजेएनव्ही (85). सार्वजनिक क्षेत्रतील बँकांपैकी इंडियन बँक (81.51), आयडीबीआय बँक (76.5), इंडियन ओव्हरसीज बँक (78.8), युको बँक (77.2), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (88.63), बँक ऑफ महाराष्ट्र (85.21), पंजाब अॅण्ड सिंध बँक (81.42) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (88). (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- ‘ऑफर फॉर सेल’ या माध्यमातून शेअर विक्रीवरील र्निबधही सेबीने शिथिल केले आहेत.
- कंपन्यांमध्ये 1क् टक्क्यांहून अधिक भागभांडवल धारण करणा:या विना प्रवर्तकांनाही त्यांचे भांडवल या मार्गाने विकता येईल. 
- बाजारमूल्यानुसार आघाडीच्या 2क्क् कंपन्यांनाही विक्रीचा हा मार्ग उपलब्ध असेल.
- ज्यांच्याकडे बोनस शेअर आहेत असे कंपनीचे प्रवर्तक व इतर गुंतवणूकदार त्यांच्याकडील शेअर ‘आयपीओ’मध्ये विकू शकतील. यासाठी असे शेअर किमान एक वर्ष स्वत:कडे ठेवण्याचे बंधन असणार नाही.