शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बाबू जाणार आता जंगल सफारीवर

By admin | Updated: October 4, 2015 23:24 IST

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये योगा करण्याचा सल्ला यापूर्वी देण्यात आला होता. आता त्यांना जंगलसफारी, नौकानयनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात सहभागी व्हायचे आहे.

नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये योगा करण्याचा सल्ला यापूर्वी देण्यात आला होता. आता त्यांना जंगलसफारी, नौकानयनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात सहभागी व्हायचे आहे. कर्मचाऱ्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने (डीओपीटी) असे अफलातून पत्रक जारी केले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेला सुस्तपणा आणि तणावामुळे एकूणच कार्यक्षमतेवर होणारा परिणाम विचारात घेत त्यांना साहसी खेळांमध्ये सहभागी करवून घेण्यावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांचे कार्यालयात गैरहजर राहण्याचे आणि आजारी सुट्या कमी करण्याचे प्रमाण घटविण्यासह उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यालयांमध्ये जीम उघडण्यासारखे प्रयोगही केले जातील. सुदृढ कर्मचारी आनंदी राहतात. त्यांच्या सकारात्मकतेमुळे सहकाऱ्यांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. असे वातावरण ग्राहकांचा आणि अभ्यागतांचा उत्साह वाढविणारे असते. याचा अर्थ जीममध्ये केलेली गुंतवणूक ही एकूणच कामकाज आणि त्या त्या कार्यालयांची प्रतिमा सुधारण्यासाठी लाभदायक ठरू शकते. सरकारी कर्मचारी साहसी खेळ आणि तत्सम मोहिमांमध्ये सहभागी झाल्यास त्यांना निसर्गापासून काही शिकता येईल. त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करता येऊ शकतो, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ट्रेकिंग ते पॅराग्लायडिंगकेवळ साहसी खेळच नव्हे तर ट्रेकिंग, गिर्यारोहण, रॉक- क्लायम्बिंग, अवघड चढ-उतारात सायकलिंग, पॅरासेलिंग, बलूनिंग, पॅराग्लायडिंग, जंगल सफारी, वाळवंट सफारी, नौकानयन, गोताखोरी, बीच ट्रेकिंग यासारख्या विविध साहसी प्रकारांमध्ये सहभाग नोंदवितानाच कर्मचाऱ्यांना पर्यावरण जागृती शिबिरांमध्येही हजेरी लावत निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे. कर्मचाऱ्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढविण्यासह सहकार्याची भावना, एक चमू म्हणून एकजुटीने काम, कोणत्याही कामासाठी सज्ज असण्याची क्षमता वाढविणे, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रतिसाद दिला जाणे या स्वरूपात कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडून आणण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)