शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! आता Whatsapp ने करता येणार पेमेंट

By admin | Updated: April 4, 2017 16:53 IST

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप भारतात पेमेंट सर्विस सुरू करणार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - आतापर्यंत तुम्ही पैशांचा व्यवहार करण्यासाठी पेटीएम, भीम किंवा मोबिक्विक यांसारख्या अॅपचा  वापर करत आहात, पण लवकरच तुम्हाला या सर्व अॅपपासून सुटका मिळणार आहे. कारण लोकप्रिय  इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप भारतात पेमेंट सर्विस सुरू करणार असल्याचं वृत्त आहे. 
 
the-ken.com ने याबाबत वृत्त दिलं  आहे. या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचे भारतात जवळपास 20 कोटी युजर्स आहेत. म्हणजे व्हॉट्सअॅपसाठी भारत जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुढील 6 महिन्यात  व्हॉट्सअ‍ॅप भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु करणार आहे. UPI द्वारे व्हॉट्सअॅप पेमेंट सर्विस सुरू करण्याची  योजना आखत आहे. डिजिटल इंडियाला हातभार लावण्यासाठी तत्पर काही कंपन्यांसोबत काम करण्यास व्हॉट्सअ‍ॅप उत्सुक आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सअॅपचे को-फाउंडर ब्रायन ऐक्टन  यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. त्यावेळी डिजीटल पेमेंट सर्विसबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. तेव्हा, आम्ही अजून कमर्शियल मेसेंजिंगमध्ये प्रवेश  केलेला नाही पण याबाबत विचार करत आहोत असं  ब्रायन ऐक्टन  म्हणाले होते. 
 
यापुर्वी स्विडेनची कंपनी  Truecaller नेही भारतात पेमेंट सर्विस लॉन्च केली आहे. यासाठी  Truecaller ने आयसीआयसीआयसोबत भागीदारी केली आहे. 
 
त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅपवरून चॅट आणि कॉलिंगशिवाय पेमेंट करण्याची सुविधाही मिळणार आहे.