शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात महिलांसाठी अच्छे दिन

By admin | Updated: August 12, 2014 03:17 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १६ ते २० महिलांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १६ ते २० महिलांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देण्याची शक्यता आहे. १६ नावे पक्षाच्या यंत्रेणेने शोधली असून, ती यादी खुद्द अध्यक्ष अमित शहा यांच्या हाती असल्याचे सूत्राने सांगितले. यातील काही महिला आमदार असून, काही माजी महापौर तर काही नगरसेविका आहेत. गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांना आमदारकी द्यावी, हा यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी किमान एका जागेवर महिला उमेदवार असावा, असाही एक विचार पुढे आला आहे.राजधानीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेनंतर शहा यांनी १६जागांवरील नावे ठरविली असून, भाजपा- शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा मिटला तर अनेक नव्या महिलांना संधी मिळू शकते. सध्या काही सुरक्षित जागांवर पक्षातील नेत्यांनी नव्याने फेर धरल्याने त्यांना बदलून किंवा नव्या मतदारसंघात महिलांची वर्णी लावण्यात येईल असहीे सूत्राचे म्हणणे आहे. विधानसभेची उमेदवारी देताना महिलांना फार महत्त्व दिले जात नसल्याचे पक्षाला दिसून आल्याने पक्षातील काही महत्त्वाच्या नावावर पक्ष विचार करत असल्याचे सांगण्यात आले. या घडामोडीला अंतिम रूप २५ तारखेच्या पुढे येणार असल्याचे सूत्राने सांगितले.पंकजा मुंडे (परळी), देवयानी फरांदे (पंचवटी), नीता केळकर (सांगली), माधुरी मिसाळ (पर्वती), स्मीता वाघ (अमळनेर), अर्चना डेहनकर (नागपूर), निवेदिता चौधरी (तिवसा), विजया राहाटकर (औरंगाबाद), मुक्ता टिळक (कसबा), मनीषा चौधरी (बोरीवली) शायना एन.सी (कुलाबा), मेधा सोमय्या (मुलूंड), मंदा म्हात्रे (बेलापूर), सीमा हिरे (नाशिक), मंजुळा गावित (नंदुरबार), सुमन गावंडे (अकोला) यांची नावे पक्षाने एका सर्व्हेच्या माध्यमातून शोेधली आहेत. म्हात्रे या अलीकडेच राष्ट्रवादीतून पक्षात आल्याने त्यांचे नाव फार तग धरत नाही. तथापि, पक्षातील कामाचा अनुभव लक्षात घेता यातील अनेकींना उमेदवारी दिला जाणार आहे.