शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी

By admin | Updated: April 20, 2015 17:04 IST

केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - मोदी सरकार हे 'सुटबूट'वाल्यांचे सरकार असून अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळात शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होता. पण मोदी सरकारने शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव दिला नाही असा आरोप त्यांनी केला. दोन्ही सरकारच्या काळातील तफावत मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत सत्ताधा-यांची पोलखोल केली.  केंद्र सरकार शेतकरी व कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या आकडेवारीसंदर्भात पंतप्रधान व केंद्राच्या अन्य मंत्रालयांमध्ये समन्वयच नाही. म्हणून मोदींनी शेतक-यांमध्ये जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

देशातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मोदी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. मग अशा स्थितीत ते ऐवढ्या मोठ्या वर्गाला कसे दुखवू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नितीन गडकरींचे कौतुक

लोकसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी थेट नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे, जे मनात आहे तेच बोलतात, शेतक-यांनी केंद्र सरकारवर अवलंबून राहू नये असे गडकरींनी म्हटले होते. ते योग्यच होते असा चिमटाही त्यांनी काढला.