नवी दिल्ली : सणावारांचे दिवस जवळ येत असल्यामुळे सराफा बाजारात दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. त्याचा परिणाम होऊन बुधवारी राजधानी दिल्लीत सोने-चांदीचे भाव वाढले.
सोने 16क् रुपयांनी वाढून 28,36क् रुपये तोळा झाले. चांदीच्या भावात 2क्क् रुपयांची वाढ झाली. त्याबरोबर चांदी 45,4क्क् रुपये किलो झाली. शिक्के निर्मात्यांकडून मागणी वाढल्याचा लाभ चांदीला
झाला.
सराफा बाजारातील सूत्रंनी सांगितले की, सणावाराचे दिवस जवळ आल्याने बाजारातील सुस्ती दूर झाली आहे. ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी खरेदी सुरू केली आहे. ग्राहकीही वाढत आहे. याचा परिणाम होणो अटळच होते.
सोन्याप्रमाणोच चांदीलाही तेजीचा लाभ झाला. तयार चांदीचा भाव 2क्क् रुपयांनी वाढून 45,4क्क् रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 185 रुपयांनी वाढून 45,क्95 रुपये किलो झाला. काल चांदी 2क्क् रुपयांनी कोसळली होती. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1 हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी 8क् हजार रुपये, तर विक्रीसाठी 81 हजार रुपये शेकडा झाला. सणावाराच्या काळात चांदीच्या शिक्क्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे शिक्क्यांचा भाव तब्बल 1 हजार रुपयांनी वर चढला, असे सूत्रंनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धता आणि 99.95 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 16क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,36क् रुपये आणि 28,16क् रुपये प्रति 1क् ग्राम झाला. काल सोन्याचा भाव 275 रुपयांनी कोसळला होता. सोन्याच्या आठ ग्राम गिन्नीचा भावही 1क्क् रुपयांनी वाढून 24,9क्क् रुपये झाला.