शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभेत महायुती दिसेल!

By admin | Updated: July 19, 2016 20:13 IST

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सर्व विरोधी आमदार एकत्र येतील व विधानसभेच्या पटलावर महायुती पहायला मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या काही आमदारांनी मंगळवारी

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 19 -  विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सर्व विरोधी आमदार एकत्र येतील व विधानसभेच्या पटलावर महायुती पहायला मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या काही आमदारांनी मंगळवारी व्यक्त केला. आमदार पांडुरंग मडकईकर यांनी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्याशी मंगळवारी या विषयी चर्चा केली व विरोधकांनी अधिवेशनात संघटीतपणा दाखविल्यास बरे होईल, असे मत व्यक्त केले.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईङिान फालेरो यांच्याशी यापूर्वी आमदार दिगंबर कामत यांचीही चर्चा झाली आहे. महायुतीच्या विषयावर गट समित्यांचे मत काहीही असो; पण तुम्ही महायुतीविरुद्ध आक्रमक होऊ नका, आम्हाला निवडणुकीवेळी महायुती करावी लागेल, असे आमदारांनी फालेरो यांना सांगितले आहे.दरम्यान, मडकईकर यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या अधिवेशनात आम्ही व अपक्ष आमदार मिळून एकत्रितपणे सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवू. आपण राणे यांच्याशी चर्चा केली व विधानसभेत आम्हाला संघटीतपणा दाखवावा लागेल, हे मत त्यांच्यासमोर मांडले. राणे यांनीही त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. येत्या 25 रोजी विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पहिली बैठक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची होईल व मग सीएलपी आणि अपक्ष व अन्य विरोधी आमदार यांची एकत्रित एक बैठक होईल.कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, सर्व विरोधी आमदार निश्चितच येत्या अधिवेशनात महायुतीचे दर्शन घडवतील. हे अधिवेशन शेवटचे असून लोकांच्या हिताच्या प्रश्नांवर आम्ही संघटीतपणा दाखवायलाच हवा. आम्ही त्याबाबत कमी पडणार नाही.राष्ट्रवादीचा काँग्रेसवर बाणराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा म्हणाले की, काँग्रेस पक्ष पुन्हा भाजपलाच सत्तेवर आणू पाहतो की काय, असा संशय मला सोमवारी झालेल्या काँग्रेस गट समित्यांच्या बैठकीमुळे येत आहे. काँग्रेसने निवडणुकीवेळी महायुतीला विरोध करणे हे कशाचे लक्षण आहे, हे लोकांनाही कळू लागले आहे.