शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकारिणीच्या जेवणावळीवर गोवा सरकारने केली उधळपट्टी

By admin | Updated: October 22, 2015 01:21 IST

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ५४३ प्रतिनिधींना ८ जून २0१३ रोजी येथील मेरियॉट रिसॉर्टमध्ये दिलेल्या जेवणावळीवर

पणजी : भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ५४३ प्रतिनिधींना ८ जून २0१३ रोजी येथील मेरियॉट रिसॉर्टमध्ये दिलेल्या जेवणावळीवर सरकारी तिजोरीतून ६ लाख ३७ हजार ७२१ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आयरिश रॉड्रिग्स यांना माहिती अधिकार कायद्याखाली मिळाली आहे.७ जून ते ९ जून काळात गोव्यात भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यम सल्लागार अधिकारी संचिता रॉड्रिग्स यांनी ४ जून रोजी शिष्टाचार खात्याला नोट पाठवून राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी जेवणासाठी खर्चमंजुरी मागितली होती. त्यात भाजपाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ४८ भोजनावळी९ मार्च २0१२ ते ८ नोव्हेंबर २0१४ या काळात मुख्यमंत्री असताना पर्रीकरांनी ४८ भोजनावळी दिल्या. त्यावर ४0 लाख ९६ हजार ३२ रुपये खर्च झाले. २१ प्रकरणांमध्ये जेवणावळीचे कारण स्पष्ट नसतानाही शिष्टाचार खात्याने बिले मंजूर केली. ९ मार्च २0१३ रोजी मेरियॉटमध्ये दिलेल्या अन्य एका जेवणावळीत ९0 जणांवर १ लाख ३७ हजार ९५0 रुपये उधळण्यात आले. २५ सप्टेंबर २0१३ रोजी हॉटेल मांडवी रिव्हिएरामध्ये ४00 जणांना दुपारी भोजन देण्यात आले. त्यावर ३ लाख ९५ हजार ६९४ रुपये खर्च करण्यात आले. उपरोक्त खर्चाबाबत जे दस्तऐवज हाती आले आहेत, ते दक्षता खात्याला सादर करून कारवाईची मागणी करणार असल्याचे आयरिश यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक पैशांचा हा अपव्यय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)‘आम आदमी’चा इशारा : आम आदमी पार्टीने या उधळपट्टीचा निषेध केला असून सात दिवसांच्या आत सरकारने हे पैसे परत करावेत. अन्यथा महालेखापालांकडे तक्रार करू, असा इशारा दिला आहे.