शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मला गोळ्या घाला, पण दलितांचे रक्षण करा!

By admin | Updated: August 8, 2016 09:14 IST

कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ्या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात.

हैदराबाद/ नवी दिल्ली: कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ््या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात. पण गोरक्षणाच्या नावाने दलितांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबायलाच हवेत, असा

सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. गोरक्षणाच्या नावाने दलितांवर अत्याचार करणारे वास्तवात गोरखधंद्यांची दुकानदारी करणारे समाजकंटक आहेत, असे म्हणून पंतप्रधानांनी शनिवारी टाऊनहॉलच्या कार्यक्रमात व्यक्त केलेला संताप ‘बेगडी’ असून त्यांना दलितांची आणि गायींची काळजी नसून हातातून जाणाऱ्या गुजरातची चिंता आहे, अशी टीका विरोधकांनी केल्यावर पंतप्रधान मोदी रविवारी त्याहूनही धारधार भाषेत हल्ला चढविला.

तेलंगणच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींनी सकाळी व दुपारी झालेल्या सरकारी कार्यक्रमांमध्ये व सायंकाळी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या बैठकीत पुन्हा पुन्हा या विषयांचा उल्लेख केला आणि गायींबरोबर दलितांचे आणि वंचितांचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे निक्षुन सांगितले. दुपारी तेलंगण सरकारच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत हा विविधतेने नटेलला देश आहे.

देशाची एकता व अखंडता जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने गोरक्षा व गोसेवा करावी, कारण गाय ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. पण त्याच बरोबर काही बनावट गोरक्षक देशात फूट पाडू पाहात आहेत. त्यांच्यापासून सावध राहून अशा लोकांना कडक शासन केले जायला हवे. असे झाले तरच भारत महान उंची गाठू शकेल.‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानाला अभिमानानेने आपले म्हणणाऱ्या आपण भारतीयांनी दलित बांधवांना सन्मानाने वागविले नाही तर जग आपल्याला माफ करणार नाही.- नरेंद्र मोदी, (पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत)गुजरातमध्ये बुडत असलेल्या भाजपाला सावरण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या संतापाचा राजकीय रोख समजण्यासारखा आहे. त्यांनी एक मुख्यमंत्री गमावला आहे व कदाचित ते एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहेत. पण आमची चिंता याहून मोठी आहे.-टॉम वडक्कन, प्रवक्ते, काँग्रेसपंतप्रधानांचा संताप बेगडी आहे कारण तो दलित मतांवर डोळा ठेवून व्यक्त केलेला आहे. त्यांना खरंच काळजी होती तर या समाजकंटकांवर याआधीच का कारवाई केली गेली नाही. कारवाई न करता केवळ संताप व्यक्त करणे म्हणजे या दुष्कृत्यांना पाठिंबा देणेच आहे.-वृंदा करात, नेत्या, माकपगोरक्षक नावाचा नवीनच प्रकार हल्ली पुढे आला आहे. त्यांना इतके दिवस कोणाचा आशिर्वाद होता? मोदी यापूर्वीच बोलले असते तर बरे झाले असते. परंतु आता मोदी बोलले तरी या गोरक्षकांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही.-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस