शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा इच्छूक स्पर्धेत गिरीश महाजन: उमेदवाराची आज घोषणा होणार; शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी सुरेशदादा जैन व गुलाबराव यांच्याशी चर्चा

By admin | Updated: November 2, 2016 00:44 IST

जळगाव : विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा जण स्पर्धेत आहेत. बुधवारी पक्षाकडून उमेदवाराचे नावे घोषित होईल. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जळगाव : विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा जण स्पर्धेत आहेत. बुधवारी पक्षाकडून उमेदवाराचे नावे घोषित होईल. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानपरिषदेच्या युतीसाठी प्रयत्न सुरु
गिरीश महाजन म्हणाले, विधान परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, युतीच्या निर्णयाबाबत उशिर झाला. लवकर निर्णय झाला असता तर फायदा झाला असता. विधान परिषदेसाठी युती असावी यासाठी बोलणी सुरू आहे. जळगाव विधान परिषदेची जागा गेल्या दोन टर्मपासून भाजपाकडेच आहे. त्यामुळे यावेळीही उमेदवार आमचा असेल. निवडणुकीत सहकार्य मिळावे म्हणून सोमवारी शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

सहा जण स्पर्धेत
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमदेवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक श्रीकांत खटोड, गोविंंद अग्रवाल, माजी नगरसेवक यशवंत पटेल, दिनेश जोशी हे स्पर्धेत आहेत. अमळनेरचे डॉ. रवींद्र चौधरी यांनीही भेट घेतली. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाईल. बुधवारी पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल.
--------
साधना महाजन उमेदवार नाही
साधना महाजन यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत महाजन म्हणाले, बिनविरोध निवडून देऊ असे जर कोणी म्हणाले तरी आपल्या कुटुंबातील कोणीही या निवडणुकीसाठी उमेदवार नसेल.
------
त्या वादावर बोलणे टाळले
पक्षाने चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे व अमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांना पक्षातून निलंबित केले. मात्र पक्षाच्या जिल्हा कार्यालयात गोंधळ होऊन घोषणाबाजी झाली त्यांच्यावर कारवाई का नाही? असे विचारले असता या विषयावर गिरीश महाजन यांनी बोलणे टाळले.