शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश कर्नाड, सिम्हा यांना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: November 13, 2015 00:44 IST

ज्ञानपीठ विजेते लेखक गिरीश कर्नाड आणि भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आधीच चिघळलेल्या टिपू सुलतान यांच्या जयंतीवादाला वेगळे वळण मिळाले आहे

बेंगळुरू : ज्ञानपीठ विजेते लेखक गिरीश कर्नाड आणि भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आधीच चिघळलेल्या टिपू सुलतान यांच्या जयंतीवादाला वेगळे वळण मिळाले आहे. १८ व्या शतकातील म्हैसूरचे राज्यकर्ते टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावरून कर्नाटकच्या कोडोगू भागात हिंसाचार उफाळला आहे. गोळीबारात युवक ठार झाल्यामुळे मृत्युसंख्या दोन झाली आहे.बेंगळुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहराचे संस्थापक केम्पे गौडा यांच्याऐवजी टिपू सुलतान यांचे नाव द्यावे, असे विधान प्रसिद्ध नाट्यलेखक, अभिनेते कर्नाड यांनी केल्यामुळे वाद उफाळला आहे. विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच तुम्हाला गोळ्या घालू, अशी धमकी कर्नाड यांना टिष्ट्वटरवरून देण्यात आली. केम्पे गौडा यांच्या वोक्कालिगा समुदायातील विविध संघटना आणि भाजपने कर्नाड यांच्या विधानाला विरोध केला होता.कोडोगू येथील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भाजपचे खासदार सिम्हा यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यांनी लगेच म्हैसूर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. कर्नाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी टिष्ट्वटरवरून धमकी देणाऱ्याचा शोध चालविला आहे.———————————————-टिष्ट्वटची चिंता नाही-कर्नाडधमकी आल्यानंतर कर्नाड यांनी जराही विचलित न होता टिष्ट्वटमुळे मी चिंतित नसल्याचे स्पष्ट केले आहे. कलबुर्गी यांची हत्या भाडोत्री मारेकऱ्यांनी केली होती,असे लोक टिष्ट्वट करीत नसतात. मला धमकी देणारे भाडोत्री मारेकरी नाहीत, त्यामुळे मला चिंता करण्याचे कारण नाही. टिष्ट्वटरवरून धमकी दिली जात असेल तर त्या व्यक्तीकडे मारेकऱ्याचे गुण नाहीत, हे निश्चित, असे ते एका टीव्ही वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले. मी टिष्ट्वट गांभीर्याने घेतलेले नाही; मात्र सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर आहे. ही बाब धोकादायक आहे असे मानून सरकार मला सुरक्षा प्रदान करीत असेल तर मी सहकार्य करेन, असेही ते म्हणाले.————————————-———————————कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी देणे ही तर दहशत होय. आता गिरीश कर्नाड यांना धमकी... असहिष्णुता शब्द चुकीचा ठरतो. ही तर दहशत झाली.- सीताराम येचुरी, माकपचे सरचिटणीस,(टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया)