शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणावरून केरळमध्ये ‘घमासान’

By admin | Updated: November 10, 2015 23:02 IST

केरळमध्ये बार परवान्यांच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केरळ काँग्रेसचे (एम) नेते अर्थ आणि कायदामंत्री

नवी दिल्ली/ कोट्टयम : केरळमध्ये बार परवान्यांच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केरळ काँग्रेसचे (एम) नेते अर्थ आणि कायदामंत्री के.एम.मणी यांनी मंगळवारी रात्री राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे आणि काँग्रेसप्रणित युडीएफ सरकारला समर्थन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. या सरकारमध्ये मणी यांचा पक्ष मुख्य घटक आहे.८२ वर्षीय मणी यांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी केरळ काँग्रेसच्या (एम) सुकाणू समितीच्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मणी यांनी ज्येष्ठ नेते पी. जे. जोसेफ यांच्यासोबत बंदद्वार चर्चा केली.तत्पूर्वी केरळ काँग्रेसचे (एम) बंडखोर नेते पीसी जॉर्ज यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करीत हिंमत असेल तर मणी यांनीही राजीनामा द्यावा असे थेट आव्हान दिल्यानंतर काँग्रेसने बचावात्मक पवित्रा अवलंबला होता, मात्र अखेर मणी यांनी राजीनामा देत तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याचा आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर मणी यांच्या राजीनाम्याची जोर धरू लागली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)त्यानंतर लगेच दक्षता विभागाने शहानिशा करीत एफआयआर नोंदविला होता. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी तपास चालू ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर मणी यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले होते.मणी यांनी भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या ४०० पेक्षा जास्त बारमालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केरळ राज्य बार हॉटेल मालक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बिजू रमेश यांनी गेल्या वर्षी केला होता. आमदार पीसी जॉर्ज यांनी १२ नोव्हेंबर रोजी विधानसभाध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपविणार असल्याचे स्पष्ट केले. मणी यांनी यापूर्वीच राजीनामा देण्यास नकार दिला असताना जॉर्ज यांनी अचानक वादात उडी घेत त्यांना थेट आव्हान दिल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला.